Kiara and Sidharth Malhotra : कियारा आणि सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा होणार आई-बाबा; फोटो शेअर करत दिली ‘गुड न्यूज’
Kiara and Sidharth Malhotra : मुलीच्या जन्मानंतर जवळपास दीड वर्षाने कियाराने पुन्हा एकदा चाहत्यांना आनंदाची बातमी दिली

Kiara and Sidharth Malhotra : बॉलीवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहेत. दोघांनीही सोशल मीडियावर एका सुंदर फोटोसह ही आनंदाची बातमी दिली आहे. ही पोस्ट समोर येताच चाहते आणि बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.
या फोटोत कियारा आणि सिद्धार्थचा हात एकमेकांच्या हातात असून त्यांची मुलगी सरायाने सुद्धा दोघांच्या हातात तिचा हात ठेवला आहे. या तिघांसोबत इवलेसे पायमोजे दिसत आहेत. हा फोटो शेअर करुन सिद्धार्थ-कियाराने ही गुड न्यूज सर्वांना दिली आहे.
View this post on Instagram
कियारा – सिद्धार्थने हा फोटो शेअर करुन कॅप्शन लिहिलं की, ”पुन्हा एकदा या सुंदर गिफ्टच्या रुपाने आम्हाला आशीर्वाद मिळाला आहे. आमचं हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरुन गेलं आहे.” कियाराने हा फोटो शेअर करताच चाहत्यांनी लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव करुन त्यांचं अभिनंदन केलं आहे.
कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी फेब्रुवारी २०२३ मध्ये राजस्थानच्या जैसलमेरमध्ये लग्न केले होते. लग्नानंतर जवळपास दोन वर्षांनी जुलै २०२५ मध्ये दोघे पहिल्यांदा आई-बाबा झाले. त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला होता. या जोडीने मुलीचे नाव सराया मल्होत्रा ठेवले. आता मुलीच्या जन्मानंतर जवळपास दीड वर्षाने या जोडीने पुन्हा एकदा चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
Jamkhed News: जामखेडमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांवर दगडफेक; तिघांवर गुन्हा दाखल





