घरातच उघडला बनावट नोटांचा छापखाना; दोघांना अटक
Updated On:

लुधियाना – घरातच बनावट नोटांची छपाई करण्याऱ्या दोघांना लुधियाना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 2 लाख 40 हजारांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
प्रिंटर आणि स्कॅनर च्या मदतीने घरातच नकली नोटा छापत होते. त्यांच्याकडून 2 लाख 40 हजारांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अशी माहिती लुधियानाच्या ग्रामीण पोलीस आयुक्त कंवरदीप कौर यांनी दिली आहे.
https://twitter.com/AHindinews/status/1316346791965589504
दरम्यान, नकली नोटा छापण्याचे आणि त्या बाजारात आणण्याचे सत्र सुरूच आहे. 9 ऑक्टोंबर रोजी अंबाला मधील कुरूक्षेत्र येथे बनावट नोटा छापणाऱ्या पती पत्नीला पोलीसांनी अटक केली होती.





