नगर – श्रीरामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या सेठ नंदलाल धूत आणि मोहनलाल रामअवतार मानधना कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य शाखेचा निकाल प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही 100 टक्के लागला आहे.
या परिक्षेत वाणिज्य विभागात मेन्सी मुरदभाई मोब ही विद्यार्थीनीने 90.76 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. दर्शना प्रकाश शिंगवी ही हिने 89.69 टक्के गुण मिळवून द्वितीय आली. सिद्धी अजय चंगेडे हिने 89.38 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तसेच विज्ञान शाखेत सुमित भरत वामन याने 91.61 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.
रोहन साळुके याने 83.85 टक्के गुण मिळवून द्वितीय तर आदित्य जाधव हा 83.69 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष गोपाल धूत, उपाध्यक्ष नंदकुमारझंवर व मोहनलाल मानधना, सचिव डॉ. शरद कोलते, राजेश झंवर, बजरंग दरक, तसेच इतर पदाधिकारी, प्राचार्या राधिका जेऊरकर आणि कॉलेजच्या समन्वयक संपदा देशपांडे यांनी हार्दिक अभिनंदन केले.