Thalapathy Vijay : राजकीय शो ब्लॉकबस्टर.! ‘विजय’ ठरला तमिळनाडूचा नवा धुरंधर; कोणती आश्वासनं ठरली गेमचेंजर?
सुपरस्टार विजय याने राजकारणात प्रवेश केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. विजय यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांच्या सभांना, विशेषतः शहरी भागांमध्ये, प्रचंड गर्दी जमते.

Thalapathy Vijay । TVK Party : तमिळनाडूच्या राजकारणात एका नव्या विजयाचे पर्व सुरू होणार आहे. तमिळनाडूच्या राजकारणात अभिनेते थलपती विजय यांच्या प्रवेशाने पहिल्याच विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेनं जोरदार प्रभाव पाडला आहे. विजय यांच्या ‘तमिळगा वेत्री कळघम’ (TVK) या नव्या पक्षाने तामिळनायडूतील राजकीय समीकरणे पूर्णत: बदलून टाकले आहे.
थलपती विजय याला तामिळनाडूच्या जनतेने भरभरुन मतदान केलं आहे. सकाळपासून सुरु असलेल्या मतमोजणीत थलपती विजय याचा TVK पक्ष सर्वात जास्त आघाडीवर दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार, थलपती विजय यांचा टीव्हीके १०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे.
थलपथी विजय कोण आहेत?
‘विजय’ हे एक तमिळ चित्रपट अभिनेते असून तमिळगा वेत्री कळघम म्हणजे टीव्हीके या संघटनेचे संस्थापक आहेत. ते ५१ वर्षांचे असून पदवीधर आहेत. त्यांची संपत्ती ₹६४८.९ कोटींची आहे. त्यांच्यावर दोन फौजदारी खटले प्रलंबित आहेत.
विजय यांचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. त्यांच्या सभांना, विशेषतः शहरी भागांमध्ये, प्रचंड गर्दी जमते. मात्र, टीकाकार त्यांच्या राजकीय अनुभवाच्या अभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवत भव्य यश संपादन केले आहे.
ही ठरली विजय यांची बलस्थाने :
तरुणांकडून भक्कम पाठिंबा
फॅन क्लबवर आधारित मतदारवर्ग
शहरी कामगार वर्गामध्ये लोकप्रियता
पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांचा पाठिंबा
सत्ताविरोधी लाट
सोशल मीडियावरील प्रभाव
ग्रामीण भागात मर्यादित पोहोच; मात्र शहरी मध्यमवर्गामध्ये पिछाडी भरून काढली
विजय यांची आश्वासने :
महिलांसाठी २,५०० रूपये मासिक मदत
विवाह सहाय्यासाठी ८ ग्रॅम सोने
स्वयं-सहायता गटांसाठी ५ लाख रूपये बिनव्याजी कर्ज
शिक्षण सुरू ठेवण्यासाठी १५,००० रूपये वार्षिक मदत
एआय युनिव्हर्सिटी आणि एआय सिटी
लघु शेतकऱ्यांसाठी पीक कर्जाची संपूर्ण माफी
किमान आधारभूत किंमत : धानासाठी रूपये ३,५००, उसासाठी रूपये ४,५००
५ लाख सरकारी नोकऱ्या
५ लाख इंटर्नशिप
४,००० रूपये बेरोजगारी भत्ता
विजय यांच्या ‘TVK’ पक्षाची जादू !
सुपरस्टार विजय याने राजकारणात प्रवेश केल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. निवडणूक आयोगाच्या दुपारी २:३५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, टीव्हीकेचे उमेदवार तब्बल १०७ जागांवर आघाडीवर आहेत, तर ५५ जागांवर ते दुसऱ्या स्थानावर आहेत.
बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ११८ या जादूई आकड्याच्या दिशेने विजय यांचा पक्ष वेगाने वाटचाल करताना दिसत आहे. काही जागांवर ही लढत अत्यंत अटीतटीची असून कुंभकोणम, शोलावंदन आणि विक्रवंडी या मतदारसंघांत टीव्हीके उमेदवार अवघ्या १०० ते १५० मतांच्या फरकाने पिछाडीवर आहेत.







