Hunar Hali : टीव्ही अभिनेत्री ९ वर्षांच्या संसारानंतर पतीपासून होणार विभक्त
Hunar Hali : हुनर आणि मयंकने ऑगस्ट २०१६ मध्ये पारंपरिक शीख पद्धतीने लग्न केले होते

Hunar Hali : टीव्ही अभिनेत्री हुनर अली सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ९ वर्षांच्या संसारानंतर अभिनेत्रीने पती मयंक गांधीपासून अधिकृतपणे घटस्फोट घेतला आहे. दोघांचे लग्न २०१६ मध्ये झाले होते आणि आता २०२६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांनी २०२५ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, घटस्फोटाचा अंतिम निकाल लागला तेव्हा हुनर तिच्या ‘रिमझिम- छोटी उमर बडा सफर’ मालिकेचं शूटिंग करत होती. सेटवर असतानाच तिला याबद्दल माहिती मिळाली. घटस्फोटाबद्दल कळताच अभिनेत्री प्रचंड भावुक झाली होती. तिला आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. ती सेटवरच ढसाढसा रडू लागली होती.
हुनरच्या वकिलांनी या प्रकरणी भाष्य करत म्हटलं की, “घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. वैवाहिक मतभेद असले की असं अनेकदा घडतं त्यामुळे, घटस्फोटाच्या संबंधित काही मुद्दे होते ज्यांचं निराकरण करणं आवश्यक होतं. सततच्या चर्चा आणि कायदेशीर प्रक्रियेतून, दोघांनीही या निर्णयाला संमती दर्शवली आहे.”
हुनर आणि मयंकने ऑगस्ट २०१६ मध्ये पारंपरिक शीख पद्धतीने लग्न केले होते. त्यांचे लग्न खूप चर्चेत राहिले होते आणि लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. चाहत्यांनाही या दोघांची जोडी खूप आवडायची. मात्र, आता दोघेही वेगळे झाले आहेत.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, हुनरने ‘पटियाला बेब्स’, ‘परमवतार श्री कृष्ण’, ‘तेरा मेरा साथ रहे’ आणि ‘दिवानी’ सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तर मयंक ‘अदालत’, ‘तेरी मेरी गल बन गई’ आणि ‘काला टीका’ मध्ये दिसला होता. हुनर आणि मयंक हे टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कलाकार आहेत.
हेही वाचा:






