Pune News : तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाकडून हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रेचे आयोजन

पुणे : श्री तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाने हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रेचे आयोजन केले होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा नुकताच मिळाला आहे त्या अनुषंगानेच भारत मातेची प्रतिमा तसेच आठ फुटी गुढी त्यावर मराठी भाषेचे अलंकारिक फलक अशा स्वरूपाचा रथ तयार केला होता.. महात्मा महात्मा फुले मंडई टिळक पुतळ्यापासून मिरवणुकीला सुरुवात झाली
सदर मिरवणुकीत खासदार मेधाताई कुलकर्णी आमदार हेमंत रासने गायत्रीताई खडके निवेदिता एकबोट मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, नितीन पंडित, विनायक कदम आणि व्यापारी , कार्यकर्ते, महिला सभासद पारंपारिक वेशात सहभागी झाले होते. अग्रभागी गजलक्ष्मी ढोल पथकाने अत्यंत बहारदार वादन करून मंगलमय वातावरणाची निर्मिती केली. ही यात्रा शनीपार बाजीराव रस्त्याने आप्पा बळवंत चौक तेथून जोगेश्वरी बुधवार चौक समाधान चौक लक्ष्मी रस्त्याने तुळशीबागेत संपन्न झाली.





