Tuljapur Temple : तुळजापुरात आई राजा उदो उदोचा जयघोष! तुळजाभवानी मातेच्या घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ
Tuljapur Temple : श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला रविवारी (११ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता विधिवत घटस्थापनेने प्रारंभ झाला.

Tuljapur Temple : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवाला रविवारी दुपारी १२ वाजता विधिवत घटस्थापनेने प्रारंभ झाला. (Tuljapur Temple)
आई राजा उदो उदो, सदानंदीचा उदो उदो या जयघोषाने तुळजापूरनगरी भक्तिमय झाली असून, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Tuljapur Temple)
मातेच्या नवरात्र महोत्सवाची तयारी पूर्ण झाली असून, महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून भाविक तुळजापूरमध्ये दाखल होत आहेत. भवानी ज्योत घेऊन जाण्यासाठीही भाविकांची मोठी लगबग सुरू होती. (Tuljapur Temple)
शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी श्री तुळजाभवानी मातेची पारंपरिक मंचकी निद्रा सुरू होती. आश्विन शुद्ध प्रतिपदेच्या पहाटे ही निद्रा संपल्यानंतर मातेची मुख्य मूर्ती पुन्हा सिंहासनावर विराजमान करण्याची धार्मिक प्रक्रिया पहाटे पार पडली. या विधीला मंदिरातील परंपरेनुसार विशेष महत्त्व आहे. (Tuljapur Temple)
मातेच्या मुख्य मूर्तीला पंचामृत अभिषेक, नित्योपचार पूजा, वस्त्रालंकार, नैवेद्य, धूपारती आणि अन्य धार्मिक विधी करण्यात आले . त्यानंतर दुपारी १२ वाजता सिंह गाभाऱ्याजवळ विधिवत घटस्थापना करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यात भोपे-पुजारी तसेच जिल्हाधिकारी डॉ. कीर्ती किरण पुजार आणि त्यांच्या पत्नी यांचाही सहभाग होता. (Tuljapur Temple)
नवरात्रोत्सवात भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन दर्शन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. घाटशीळ रस्त्यावरील तात्पुरत्या दर्शन मंडपाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. भाविकांना बीडकर पायरी मार्गे दर्शन मंडपात प्रवेश देण्याचे नियोजन करण्यात आले असून, गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी मंदिर परिसरात आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. (Tuljapur Temple)
नऊ दिवस धार्मिक कार्यक्रम
नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज मातेची विधिवत पूजा-अर्चा आणि सायंकाळी छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. नवरात्रातील पुढील टप्प्यांत मातेच्या विविध रूपांतील अलंकार महापूजा बांधण्यात येणार असून, भाविकांना या पूजांचे दर्शन घेता येणार आहे. (Tuljapur Temple)
मंदिर परिसरात अखंड वेदपठणासाठी स्थानिक ब्रह्मवृंदांना आमंत्रित करण्यात येणार असून, धार्मिक विधींमुळे तुळजापूर नगरीत नऊ दिवस भक्तिमय वातावरण राहणार आहे. (Tuljapur Temple)





