Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची थेट ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये दखल; ‘फूड इन्स्पेक्टर रॉकस्टार’ म्हणत कामाचं कौतुक
Tukaram Mundhe: आपल्या धडाकेबाज कारवाई आणि कडक प्रशासकीय निर्णयांमुळे कायम चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहेत.

Tukaram Mundhe: आपल्या धडाकेबाज कारवाई आणि कडक प्रशासकीय निर्णयांमुळे कायम चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले आहेत.
अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र *‘द न्यूयॉर्क टाइम्स’*ने त्यांच्या कामाची दखल घेतली आहे. ‘इन इंडिया, अ फूड इन्स्पेक्टर इज अ रॉकस्टार’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या वृत्तातून त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. (Tukaram Mundhe)
तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यातील अन्नपदार्थांच्या सुरक्षिततेबाबत कठोर भूमिका घेतली आहे. विविध रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, खाद्यपदार्थांची दुकाने, गोदामे आणि क्विक-कॉमर्स कंपन्यांच्या डार्क स्टोअर्सची तपासणी करून प्रशासनाने कारवाई केली आहे. या मोहिमांमध्ये भेसळयुक्त तसेच नियमांचे उल्लंघन करणारा माल जप्त करण्यात आला असून, काही प्रकरणांत परवाने रद्द करण्यासह गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
#WATCH | Delhi | “Vote Chor, Gaddi Chhod’ echoes through INDIA bloc’s protest march to the Election Commission of India https://t.co/Kf9yvjoEzZ
— ANI (@ANI) October 6, 2026
अचानक तपासणी मोहिमांची चर्चा (Tukaram Mundhe)
तुकाराम मुंढे यांच्या अचानक तपासणी मोहिमा आणि नियमांची कठोर अंमलबजावणी यामुळे ते सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत. अन्नपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांना त्यांच्या कारवाईमुळे महत्त्व प्राप्त झाल्याचे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. (Tukaram Mundhe)
राज्यात तुकाराम मुंढे यांना त्यांच्या कडक प्रशासकीय कार्यशैलीमुळे ‘आयएएस सिंघम’ म्हणूनही ओळखले जाते. ते यापूर्वीही विविध प्रशासकीय निर्णयांमुळे चर्चेत राहिले आहेत. आता अन्न व औषध प्रशासनातील त्यांच्या कामाची आंतरराष्ट्रीय वृत्तपत्राने दखल घेतल्याने पुन्हा एकदा त्यांच्या कार्यपद्धतीची चर्चा सुरू झाली आहे.
‘सुशासन म्हणजे जमिनीवर बदल घडवणे’ (Tukaram Mundhe)
न्यूयॉर्क टाइम्समधील वृत्तावर तुकाराम मुंढे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सुशासन म्हणजे केवळ प्रसिद्धी मिळवणे नव्हे, तर प्रत्यक्षात ठोस बदल घडवून आणणे होय, अशी भूमिका त्यांनी मांडली.
अन्नसुरक्षेचा मुख्य उद्देश नागरिकांचे जीव वाचवणे, नियमांचे पालन सुनिश्चित करणे आणि जनतेचा विश्वास कायम राखणे हा आहे, यावर त्यांनी भर दिला. कायद्याची अंमलबजावणी निष्पक्षपणे, निर्भयपणे आणि सातत्याने झाल्यास संस्थांची विश्वासार्हता वाढते आणि नागरिकांचा व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अन्नपदार्थांमधील भेसळ रोखणे आणि नागरिकांना सुरक्षित अन्न उपलब्ध करून देणे या उद्देशाने सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांच्या कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली दखल महत्त्वाची मानली जात आहे.





