Tukaram Mundhe : आता ‘या’ लोकांना थेट जन्मठेप; तुकाराम मुंढेंचा कडक इशारा
Tukaram Mundhe : लोकांच्या आरोग्याशी खेळून दुधात घातक रासायनिक भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही.

Tukaram Mundhe : राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने मोठी मोहीम सुरू केली असून, लोकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. घातक आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ विकणाऱ्यांवर कायद्यानुसार जन्मठेपेपर्यंतची शिक्षा होऊ शकते, अशी स्पष्ट चेतावणी FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. (Tukaram Mundhe)
मुंढे यांनी सांगितले की, राज्यभर दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या तपासण्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्या आहेत. यासाठी प्रथमच राज्यातील डेअरी चालक, दूध संकलन केंद्रांचे प्रतिनिधी आणि दुग्ध उद्योगाशी संबंधित घटकांची संयुक्त बैठक घेऊन नियमांचे पालन करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या. (Tukaram Mundhe)
यावेळी आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणाचा दाखला देत त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील तपासण्यात आलेल्या दूध नमुन्यांपैकी सुमारे 32 टक्के नमुने ‘Unsafe’ आढळले आहेत. ही बाब अत्यंत गंभीर असून नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका असल्याचे त्यांनी नमूद केले. (Tukaram Mundhe)
मुंढे यांच्या म्हणण्यानुसार, दुधात केवळ पाणी मिसळण्याचे प्रकारच नव्हे, तर आरोग्यास घातक रसायने आणि इतर पदार्थ मिसळल्याच्या घटनाही तपासात समोर येत आहेत. अशा प्रकारांना कोणतीही माफी दिली जाणार नसून, हा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर गुन्हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Tukaram Mundhe)
त्यांनी सांगितले की, अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार (Food Safety and Standards Act) जीवाला धोका निर्माण करणारे ‘Unsafe Food’ विकल्यास संबंधितांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल होतो आणि न्यायालय दोषी ठरवल्यास जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. (Tukaram Mundhe)
व्यवसायिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, तसेच नागरिकांनीही अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत जागरूक राहावे, असे आवाहन करत मुंढे म्हणाले की, “लोकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.” (Tukaram Mundhe)
दरम्यान, FDA ने राज्यभर दूध, दुग्धजन्य पदार्थ, डेअरी, दूध संकलन केंद्रे आणि चिलिंग सेंटरवर तपासणी अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Tukaram Mundhe)






