जेवणात फिनेल घालून पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न, गुलाबजामुनच्या आग्रहानं उघडं पडलं पितळ
Updated On:

सांगली – जेवणात फिनेल घालून पत्नीकडून पतीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी महिलेस ताब्यात घेतल असून पुढील तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी पतीला गुलाबजामुन खाण्याचा आग्रह करत होती. पतीने नकार दिल्यानंतरही आग्रह सुरुच होता. त्यामुळे पतीला संशय आला आणि पत्नीचे पितळ उघडे पडले. याबाबत पतीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी संशयित आरोपी महिलेस ताब्यात घेतले आहे असून पुढील तपास सुरु केला आहे.





