रात्री झोप न येण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी ‘हे’ उपाय करून पहा

अनेकजण आजकाल झोपेच्या तक्रारीमुळे त्रस्त आहेत. लोकांना रात्री उशिराने झोप लागणे, लागली तरी ती शांत लागत नाही, रात्री झोपेत स्वप्न पडणे, रात्री सतत् जाग येणे अश्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तसेच झोपेच्या तक्रारीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. अपुऱ्या झोपेमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते. शरीर लवकर थकते.
रात्री झोप न येण्याची अनेक कारण असू शकतात. ऑफिस मध्ये महत्वाची मीटिंग असणे, व्यवहारिक जीवनातील समस्या, कौटुंबिक समस्या अश्या अनेक समस्यांमुळे वैचारिक घालमेल आपल्या मनात सुरु असते. अश्या अनेक कारणांमुळे रात्री पुरेशी झोप होत नाही. यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. साधारण सात ते आठ तासांची दरोरोज झोप गरजेची आहे. तर लहान मुलांना आठ ते दहा तास आणि बालकांना चौदा तासापर्यंतची झोप घेणे आवश्यक आहे.
झोप न लागण्याची समस्या दूर करण्यासाठी खालील उपाय करून पाहा –
१. रोज रात्री झोपण्यापूर्वी 5 ते 10 मिनिटे प्राणायाम करा.
२. दुपारी जेवण केल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यावी, रात्रीचे जेवण केल्यानंतर काही वेळ चालणे आवश्यक आहे.
३. व्यायाम दरोरोज करणे देखील गरजेचे आहे.
४. सूर्यनमस्कार: शरीर थकवण्यासाठी एकतर झोपण्यापूर्वी एक तास व्यायाम करा, चाला किंवा फक्त 15 मिनिटे सूर्यनमस्कार करा. हे 12 सूर्यनमस्कार किमान 12 वेळा करा.




