Health Problem : ‘घोरणे’ हा प्रामुख्याने उष्णतेशी संबंधित विकार मानला जातो. शरीरात उष्णता वाढली की घशाच्या आतील भागात सूज येण्याची शक्यता वाढते. विशेषतः घशातील पडजीभ (Uvula) सूजते, आणि याच सूजेचा थेट परिणाम घोरण्यावर होतो. पडजीभ ही जिभेच्या मागील बाजूस, टाळ्याच्या (तालूच्या) खालून लोंबकळणारी स्नायूंची रचना आहे. ती साधारणतः ४–५ मिमी जाडीची, सुमारे २ सेंटीमीटर लांब, वरून रुंद आणि खालून टोकदार अशा त्रिकोणी आकाराची असते. एखादी व्यक्ती जीभ आत घेऊन ‘आ’ असा आवाज करते तेव्हा ही पडजीभ सहज दिसते. घोरणे म्हणजे नेमकं काय.! उष्णता वाढल्यावर किंवा घशाला दाह झाल्यावर पडजीभेच्या टोकाला सूज येते. त्यामुळे तिची लांबी व जाडी वाढते. झोपेच्या वेळी शरीर सैल अवस्थेत असताना ही सुजलेली पडजीभ श्वसनमार्गात अडथळा निर्माण करते. श्वास घेताना व सोडताना (उच्छवासाच्या वेळी) ती कंप पावते आणि त्या कंपामुळे जो आवाज निर्माण होतो, त्यालाच आपण ‘घोरणे’ असे म्हणतो. यावर उपाय काय? – आपण ‘घोरतो आहोत’ हे ज्याचे त्याला समजत नाही. पण घरातील इतरांना त्रास होतो, त्यांची झोपमोड होते. काहींना भीती वाटते. त्यामुळे कुटुंबियांकडून तक्रार आल्यास व्यक्तीने लगेच उपचार सुरू करावेत. – अंगठ्याच्या टोकाला थोडी हळदपूड घेऊन, तोंड उघडून, त्यावेळी आंगठा तोंडात ठेवून ती हळदीची पूड पडजिभेला लावावी. हे काम दिवसातून दोन तीन वेळा करावे. हळद जंतुनाशक व सूजनाशक असल्याने हळद लावण्याचा फायदा होतो. Snoring Problem – घशातील उष्णता कमी करण्यासाठी आपण घरात बनवतो ते साजूक तूप, मानेला बाहेरून चोळावे याने घशातील सूज कमी होते. – प्राणायामातील कपालभाती करण्याने अनेक फायदे होतात, त्याने सर्व श्वसनसंस्था निरोगी राहते. – उशी न घेता झोपायची सवय करावी. सुरुवातीला २ इंच जाड उशी असेल तर हळुहळू तिची जाडी दीड इंच, नंतर एक इंच, अर्धा इंच अशी दर ८-१० दिवसांनी कमी कमी करत जावे. म्हणजे त्या त्यावेळी शरीराची सवय बदलत जाते. – शक्यतो कुशीवर झोपावे. – झोपताना नाकात २-२ थेंब देसी गाईचे तूप घालावेत, याला नस्य असे म्हणतात. यावेळी मान जास्तीत जास्त मागे करून नाक काटकोनात यावे, म्हणजे टाकलेले तुपाचे थेंब नाकामागील पोकळी मध्ये जाईल. त्याचवेळी ४-५ मिनिटे तरी त्याच स्थितीत रहावे, मग स्थिती बदल करावा. – वजन वाढले की येणाऱ्या अनेक समस्या मध्ये ही एक समस्या आहे. म्हणून शक्यतो वजन वाढू देऊ नये. – झोपण्यापूर्वी अनेकांना विडी, सिगारेट, दारू पिणे याची सवय असते. पण याने उष्णता वाढत असल्याने घोरणे थांबवण्यासाठी या व्यसनांपासून दूर राहावे. घोरण्याचे दुष्परिणाम काय? – झोप पूर्ण न होणे – दिवसा थकवा व आळस – लक्ष केंद्रीत न होणे – जोडीदाराच्या झोपेवर परिणाम – काही वेळा स्लीप अॅप्नियासारखा गंभीर विकार हे देखील वाचा… Night sleep problems : रात्री चांगली झोप मिळत नाही? ‘हे’ जबरदस्त ड्रिंक एकदा प्याच, मूड होईल…. Blood Purifier: आजारांना रामराम! रक्त शुद्ध करणारे ३ सोपे नैसर्गिक उपाय, रोज करा आणि शरीरातली घाण फेकून द्या