Dirty lemon drink । Night – झोप आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. पुरेशी झोप झाली नाही तर आपल्या आरोग्याचे अनेक प्रश्न उभे राहतात. रात्रीची झोप तर आवश्यकच असते, पण जर तुम्हाला रात्रीची पुरेशी झोप मिळत नसेल तर त्याकडे गंभीरतेने पाहण्याची गरज आहे. रात्रीची आवश्यक झोप न मिळाल्यास कित्येक गंभीर आजारांना आयते निमंत्रण मिळते. दरम्यान, या समस्येतून सुटका मिळवायची असल्यास एक खास पेय झोपण्यापूर्वी प्यायल्यास तुम्हाला झोप येण्यास मदत मिळेल. हे पेय झोपताना 15 मिनिटांपूर्वी प्यावे. यानंतर काही वेळानं तुम्हाला नक्कीच चांगली झोप येईल. डर्टी लेमन ड्रिंक : ‘डर्टी लेमन ड्रिंक’ असं या पेयाचं नाव आहे. बऱ्याच जणांनी या पेयाचं नाव ऐकलेही असेल. या ड्रिंकमध्ये लिंबू रसाव्यतिरिक्त अन्य सामग्रीचाही वापर केला जातो. ‘डर्टी लेमन ड्रिंक’ मध्ये पाणी, ताज्या हळदीची पेस्ट, गुलाब पाणी आणि कॅमोमाईलचं फुलाचा वापर केला जातो. या साम्रगीचं मिश्रण करून हे ड्रिंक तयार केलं जातं. Dirty lemon drink या ड्रिंकमध्ये लिंबूच्या रसाचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्यास मदत होते आणि तुम्हाला चांगली झोप देखील येते. या रण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सामग्रीमध्ये कित्येक औषधी गुणधर्म आहेत. ही बातमी वाचा : Tight clothing : टाईट कपड्यांचा ट्रेंड ठरत आहे धोकादायक; महिलांनो आताच काळजी घ्या, अन्यथा होईल गंभीर आजार ! इतर फायदे ! पचन सुधारण्यास मदत : लिंबू व जिंजरसारखे घटक पचनक्रिया सक्रिय करतात, गॅस व अपचन कमी होण्यास मदत होते. शरीर डिटॉक्सला सपोर्ट : काही प्रकारांमध्ये असलेले Activated Charcoal शरीरातील काही विषारी घटक शोषून काढण्यास मदत करू शकते. हायड्रेशन वाढवते : साध्या पाण्यापेक्षा चवदार असल्याने पाणी पिण्याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. ऊर्जा व फ्रेशनेस : लिंबातील नैसर्गिक घटक थकवा कमी करून शरीराला ताजेपणा देतात. त्वचा व केसांसाठी फायदेशीर : काही डर्टी लेमन ड्रिंकमध्ये कोलाजेन, अँटीऑक्सिडंट्स किंवा हर्बल घटक असतात, जे त्वचेचा ग्लो वाढवण्यास मदत करतात. कमी साखर, कमी कॅलरी : हे ड्रिंक्स साधारणतः लो-कॅलरी आणि कमी साखरेचे असतात, त्यामुळे वजनाकडे लक्ष ठेवणाऱ्यांसाठी उपयुक्त. लिव्हर हेल्थला आधार : लिंबू आणि काही हर्बल घटक लिव्हरच्या कार्यक्षमतेला सपोर्ट करतात, असा दावा केला जातो. ही बातमी नक्की वाचा : Healthy Tips : फळ की फळांचा रस? आरोग्यासाठी नेमकं काय जास्त फायदेशीर? Health Tips: हेल्दी समजून सकाळी उपाशीपोटी या चार गोष्टी अजिबात घेऊ नका, अन्यथा आरोग्याच्या तक्रारी वाढू शकतात Joe Root Record : जो रूटने मोडला रोहित शर्माचा ‘तो’ रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा ठरला चौथा फलंदाज