Who is Valmik Karad? : मुंडे घराण्याशी जवळीक, पुढे धनंजय मुंडेंचा जीवलग मित्र, असा राहिलाय वाल्मिक कराडचा इतिहास…..

पुणेः बीड येथील मस्साजोगचे सरपचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यात तीव्र स्वरुपाचे पडसाद उमटले होते. विधानसभेच्या अधिवेशनात देखील आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी कडक कारवाई करण्याची मागमी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या प्रकरणाची चौकशी सीआयडी करेल, असे जाहीर केले होते. आता या प्रकरणात मोठी अपडेट आली असून, देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी वाल्मिक कराडने पुण्यातील पाषाण रोडवरील सीआयडीच्या कार्यालयात आत्मसमर्पण केले आहे. कराडची चौकशी सीआयडी करीत असून वाल्मिक कराड याचा इतिहास नेमका काय सांगतो ?
२२ दिवसांपूर्वी बीड येथील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण झाले. या हत्या प्रकरणात सुरूवातील देशमुख यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अत्यंत निर्घूणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात वाल्मिक कराड याचे नाव समोर आले होते. तसेच कराड याचे मंत्री धनंजय मुंडेसोबत संबंध असल्याचे सांगण्यात आले होते. यानंतर सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये मुंडे आणि कराड यांचे फोटो व्हायरल झाले होते. या प्रकरणात वाल्मिक कराड फरार होता. अखेर एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करत कराडेने सीआयडीसमोर आत्मसमर्पण केले आहे.
- गेल्या १५ वर्षांत कराडवर १४ गुन्हे दाखल आहेत. सुरुवातीच्या काळात कराड धनंजय मुंडे यांच्या घरात घरकाम करायचा.
- धनंजय मुंडे यांचे वडील अण्णा मुंडे यांच्यासोबत त्याची जवळीक वाढली होती. अण्णांची सर्व कामे कराड ऐकायचा.
- धनंजय मुंडेंना विधानसभेची उमेदवारी मिळावी यासाठी कराडने हट्ट धरला होता.
- परळीतील विद्यानगर वार्डाचा माजी नगरसेवक होता. कराडवर खंडणी, फसवणूक आणि खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत.
- परळीत प्रभारी नगराध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे.
- धनंजय मुंडे यांचा जीवलग मित्र असा इतिहास वाल्मिक कराडचा इतिहास राहिलेला आहे.





