तृप्ती डिमरी दिसली रुमर्ड बॉयफ्रेंडसोबत; पापाराझींना पाहताच म्हणाली…

Tripti Dimri | बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरी ‘ॲनिमल’ चित्रपटानंतर प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटात ती रणबीर कपूरसोबत झळकली होती. त्यानंतर ती कार्तिक आर्यनसोबत ‘भूल भुलैया ३’ या चित्रपटात दिसली. मात्र आता तृप्ती कोणत्या चित्रपटामुळे नाही तर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. तृप्ती डिमरी नुकतीच तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत स्पॉट झाली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये तृप्ती डिमरी सॅम मर्चंटसोबत एका कॅफेमधून बाहेर पडताना दिसत आहेत. जेव्हा पापाराझींनी त्यांना घेरले आहे. यावेळी तृप्ती डिमरी काळ्या टी-शर्ट आणि जीन्समध्ये तर सॅम मर्चंट पांढऱ्या टी-शर्टमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
व्हिडीओमध्ये तृप्ती पापाराझींना पाहताच त्यांना फोटो क्लिक करण्यास नकार देते असल्याचे दिसते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यापूर्वी अभिनेत्री अनुष्का शर्माचा भाऊ कर्णेश शर्मासोबत तृप्ती रिलेशनशिपमध्ये होती. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाल्याचे म्हंटले जाते.
View this post on Instagram
तृप्ती डिमरीच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती ‘धडक 2’ मध्ये सिद्धांत चतुर्वेदीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 2018 च्या धडक चित्रपटाचा सिक्वेल आहे, ज्यात जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर मुख्य भूमिकेत होते. ‘धडक 2’ यापूर्वी 22 नोव्हेंबर 2024 रोजी रिलीज होणार होता.
मात्र, त्याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. तृप्ती डिमरीने २०१७ मध्ये रिलीज झालेल्या ‘मॉम’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ती ‘लैला मजनू’, ‘बुलबुल’ ‘ॲनिमल’, ‘विकी और विद्या का वो व्हिडिओ’, ‘भूल भुलैया ३’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
हेही वाचा:





