तृप्ती देसाई यांना विमानतळावर रोखले, शबरीमला न जाता परतणार

कोची : शबरीमला मंदिराच्या दर्शनासाठी पुण्यातून कोचीला गेलेल्या महिलावादी कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांच्या तीव्र निदर्शनांना सामोरे जावे लागले. त्या अद्याप कोची विमानतळावर असून पुण्यात परतण्याची शक्यता आहे. तेथे त्यांना विरोध करणसाठी सुमारे हजारभर कार्यकर्ते गोळा झाल्याने तणावाचे वातावरण आहे.
देसाई या विमानतळावर पोहोचल्या, त्यावेळी पहाटे तेथे पावणे पाचच्या सुमारास त्यांना विरोध करण्यासाठी सुमारे 100 कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांना पोलिस आयुक्तांच्या कार्यलयात नेण्यात आले. दर्शनाला जाण्यासाठी आम्हाला पोलिस संरक्षण द्या, अशी मागणी केली. त्यावेळी पोलिसांना ताब्यात घेऊन पुन्हा विमानतळावर सोडण्यात आले. त्यावेळी तृप्ती देसाई यांनी आम्ही आता परत जात असलो तरी आम्ही दर्शनासाठी पुन्हा येऊ, असे सांगितले.
दिवसभरात त्यांनी अनेक वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. त्यांनी शबरीमलाच्या दर्शनासाठी जाणे धोकादायक असल्याचे त्यांना सांगितले. त्यांच्यावर हल्ला होऊ शकतो. अगदी ऍसिड हल्लाही होऊ शकतो, असा इशारा दिला. पोलिस महासंचालक कार्यालयात अद्याप तृप्ती देसाई असल्याचे समजताच तेथेही उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांची गर्दी झाली. त्यानंतर त्या शबरीमलाला जाणार नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले. त्या पोलिस मुख्यालयात सुमारे 12 तास होत्या.
दर्शन न घेता पुण्याला जाण्याचे मान्य केल्यावर विमानतळापर्यंत जाण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त पुरवला. त्या विमान तळावर उतरल्यावर त्यांची प्रतिक्रिाया जनम या दूरचित्रवाणी वाहिनीने प्रसारीत केली त्यानंतर तेथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले.





