“रशियाला एक इंचही जमीन देणार नाही” ; ट्रम्प-पुतिन भेटीपूर्वी युक्रेनचे राष्ट्राध्यक्षांची घोषणा

Trump Putin meeting। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात लवकरच बैठक होणार आहे. ते दोघेही १५ ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये भेटण्याची शक्यता आहे. या बैठकीत युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत चर्चा होणार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना याबाबत रशियाशी व्यवहार करायचा आहे, परंतु त्याआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी एक धक्कादायक विधान केले आहे.
एका इंग्रजी वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी,”जर रशिया डोनबास प्रदेश सोडण्याच्या बदल्यात युद्धबंदीवर सहमती देण्याबाबत बोलला तर ते त्याला स्पष्टपणे नकार देतील.” असे म्हटले आहे. त्यासोबतच झेलेन्स्की यांनी “जर असे झाले तर भविष्यात पुन्हा हल्ला होऊ शकतो” असा खळबळजनक दावा देखील त्यांनी केला आहे.
युद्धबंदीच्या बदल्यात रशियाला काय हवे आहे? Trump Putin meeting।
दुसरीकडे, ट्रम्प दोन्ही देशांमधील कराराचे स्वप्न पाहत आहेत. याविषयी बोलताना त्यांनी,”शांतता करारात काही क्षेत्रांची देवाणघेवाण करता येईल.”असे म्हटले. तसेच असे मानले जाते की,युद्धबंदीच्या बदल्यात पुतिन युक्रेनला डोनबासचे ते भाग सोडण्यास सांगू शकतात जे त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. दरम्यान, रशिया आपली लष्करी कारवाई थांबवत नसल्याची बातमी आहे. त्याने पूर्वेकडील डोब्रोपिलिया शहराजवळ हल्ला केला आहे.
युक्रेनला जमीन सोडायची नाही Trump Putin meeting।
डोनबास हा युक्रेनचा एक भाग आहे, ज्याचा बहुतांश भाग रशियाने व्यापला आहे. मात्र, युक्रेनचे अजूनही एका भागावर नियंत्रण आहे. रशियाच्या रणनीतीनुसार, हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच पुतिन यांना युक्रेनने संपूर्ण परिसर रशियाला सोपवावा असे वाटते, परंतु झेलेन्स्की यासाठी तयार नाहीत. आता ट्रम्प आणि पुतिन यांच्यात एक बैठक होणार आहे, ज्यामध्ये युद्धबंदीवर चर्चा केली जाईल. ट्रम्प यांनी आधीच सांगितले होते की युद्धबंदीच्या बदल्यात जमीन करार केला जाऊ शकतो.





