Trump on Kamala Harris allegations । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नेहमीच त्यांच्या विरोधकांवर हल्लाबोल करत असतात. आता नेहमीप्रमाणे त्यांच्याकडून पुन्हा एकदा इतका विरोधकांवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांच्या निशाण्यावर राष्ट्रपती पदाच्या उमेदवार असलेल्या कमला हॅरिस आल्या आहेत. ट्रम्प यांनी यावेळी ,”या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत कमला हॅरिसने जाहिरातींवर खूप पैसे खर्च केले, नियमांकडेही दुर्लक्ष केले गेले’ असल्याचा मोठा दावा केला आहे. ट्रम्प यांनी कोणता मोठा आरोप केला आहे? Trump on Kamala Harris allegations । राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एका पोस्ट शेअर करताना,”मी डेमोक्रॅट्सचे किती पैसे देणे बाकी आहे ते पाहत आहे, त्यांनी स्वतः कबूल केले आहे की त्यांच्या पक्षातील गायिका बियॉन्सेला ११ दशलक्ष डॉलर्स देण्यात आले होते, तेही फक्त एका जाहिरातीसाठी. खर्चाच्या नावाखाली ओप्रावर तीन दशलक्ष डॉलर्स खर्च करण्यात आले होते, कमी दर्जाच्या अँकर अल शार्प्टनला ६ लाख डॉलर्स देण्यात आले होते. हे निरुपयोगी खर्च रेकॉर्ड बुकमध्ये चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले होते. जाहिरातींसाठी पैसे देणे परवानगी नाही, ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे” असे म्हणत त्यांनी मोठे दावे केले आहेत. कमला हॅरिसबद्दल काय म्हटले गेले? पुढे, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कमला हॅरिसचा उल्लेख करत, “जर नेते स्वतःला मान्यता मिळवण्यासाठी लोकांना पैसे देऊ लागले तर तुम्ही कल्पना करू शकता का? सर्व काही संपेल. कमला आणि इतर सर्व लोकांनी ज्यांना एंडोर्समेंट पैसे मिळाले आहेत त्यांनी कायदा मोडला आहे. सर्वांवर कारवाई झाली पाहिजे.” असा आरोप करत त्यांनी कमला हॅरिस यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प केवळ नेत्यांनाच लक्ष्य करत नाहीत तर त्यांनी मोठ्या अमेरिकन सेलिब्रिटींनाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. अशा परिस्थितीत, येत्या काळात हा वाद खूप वाढू शकतो. जेफ्री एपस्टाईन वाद काय आहे? Trump on Kamala Harris allegations । अध्यक्ष ट्रम्प यांनी हल्लाबोल अशा वेळी केला आहे जेव्हा ते स्वतः जेफ्री एपस्टाईन प्रकरणात अडकत आहेत. ट्रम्प यांनी तर त्या तपासाला पूर्णपणे राजकीयदृष्ट्या प्रेरित म्हटले आहे. ज्या फायली ट्रम्प एकेकाळी उघड करण्याचे आश्वासन देत होते, त्या आता त्यांची सर्वात मोठी डोकेदुखी बनल्या आहेत.