“तेहरान ताबडतोब रिकामे करा…” ; इस्रायल-इराण युद्धात डोनाल्ड ट्रम्पचा इशारा

trump on Iran Israel War। इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेले युद्धकाही केल्या संपताना दिसत नाही. त्यात आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबद्दल सोशल मीडिया एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सर्वांनी इराणची राजधानी तेहरान रिकामी करावी असा इशारा दिला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी यामध्ये,”इराणने अणु करारावर स्वाक्षरी न करण्याचा निर्णय मूर्खपणाने भरलेला आहे” असे म्हणत इराणवर सडकून टीका केली आहे.
तेहरान ताबडतोब रिकामी करावे trump on Iran Israel War।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इराणबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “मी सांगितलेल्या करारावर इराणने स्वाक्षरी करायला हवी होती. किती लाजिरवाणी आणि मानवी जीवनाचा अपव्यय. सोप्या भाषेत सांगायचे तर, इराणकडे अण्वस्त्रे असू शकत नाहीत. मी ते वारंवार सांगितले आहे! सर्वांनी तेहरान ताबडतोब रिकामी करावे!” असे म्हणत युद्ध आणखी भडकण्याची सूचक इशारा दिला असल्याचे म्हटले जात आहे.
“Everyone should immediately evacuate Tehran!”: Trump slams Iran for ignoring nuclear deal
Read @ANI Story |https://t.co/p8WXj6Ozm5#Trump #Iran #Tehran pic.twitter.com/Jy9Ns4rl54
— ANI Digital (@ani_digital) June 17, 2025
ट्रम्प यांनी इस्रायल-इराण युद्ध थांबवण्याचा दावा trump on Iran Israel War।
ट्रम्प यांनी अलीकडेच दावा केला होता की त्यांचे प्रयत्न लवकरच इस्रायल आणि इराणमध्ये शांतता प्रस्थापित करू शकतात. ट्रम्प यांनी सोशल मीडियावर लिहिले होते की ज्याप्रमाणे त्यांनी व्यापाराद्वारे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी केला आहे, त्याचप्रमाणे ते इस्रायल आणि इराणलाही वाटाघाटीच्या टेबलावर आणू शकतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले होते की, “मी व्यापाराद्वारे भारत आणि पाकिस्तानमध्ये समजूतदारपणा आणि स्थिरता आणली. दोन महान नेत्यांमधील चर्चेमुळे मोठा संघर्ष टळला. इस्रायल आणि इराणमध्ये लवकरच असाच करार शक्य आहे.”
हेही वाचा
G-7 Summit : जी-7 शिखर परिषदेला आजपासून प्रारंभ; ट्रम्प यांच्या भूमिकेकडे सर्वांचे असणार लक्ष





