व्हाईट हाऊसमधील डोनाल्ड ट्रम्प यांच्या इफ्तार पार्टीवरून वाद ; पाहुण्यांची यादी पाहून अमेरिकन मुस्लिम भडकले

Trump Iftar Party । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पहिली इफ्तार पार्टी आयोजित केली होती. पण ट्रम्प यांची ही इफ्तार पार्टी चांगलीच वादांनी वेढली गेली आहे. कारण या इफ्तार डिनरवर अमेरिकन मुस्लिमांनीच संताप व्यक्त केला आहे.
व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार डिनरचे आयोजन करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक भाषण दिले. त्यामध्ये त्यांनी, “व्हाईट हाऊसमधील इफ्तार डिनरमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. आपण इस्लामचा पवित्र महिना, रमजान साजरा करत आहोत. हा महिना खूप छान आहे. जगभरातील मुस्लिमांना रमजानच्या शुभेच्छा. आम्ही जगातील सर्वात महान धर्मांपैकी एकाचा आदर करतो.” असे त्यांनी म्हटले.
निमंत्रण नसल्याने अमेरिकन मुस्लिम भडकले Trump Iftar Party ।
पुढे त्यांनी,”२०२४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांनी मुस्लिम अमेरिकन समुदायाचे आभार मानले. व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार पार्टी आयोजित करण्याची दोन दशके जुनी परंपरा आहे. पण यावेळी अमेरिकन मुस्लिम खासदार आणि समुदाय नेत्यांना त्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते, असा आरोप करण्यात आला आहे. त्याऐवजी, मुस्लिम देशांच्या परदेशी राजदूतांना इफ्तार डिनरमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.
अनेक मुस्लिम नागरी हक्क गटांनी व्हाईट हाऊसबाहेर Not Trump’s Iftar म्हणत निषेध नोंदवला. यादरम्यान, एका निदर्शकाने म्हटले की, “हा डोनाल्ड ट्रम्पचा एक प्रकारचा ढोंग आहे. एकीकडे ते देशात मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालतात आणि दुसरीकडे ते इफ्तार पार्टी आयोजित करतात” असे म्हटले आहे.
बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात इफ्तार पार्टी सुरू Trump Iftar Party ।
२०१७ च्या सुरुवातीला ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात व्हाईट हाऊसमधील इफ्तार पार्टी रद्द केली होती. १९९६ मध्ये तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या कार्यकाळात व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार पार्टी सुरू झाली होती, जी त्यानंतरच्या अध्यक्ष जॉर्ज बुश आणि बराक ओबामा यांनी सुरू ठेवली. मुस्लिम समुदायातील प्रतिष्ठित सदस्यांव्यतिरिक्त, मुस्लिम देशांतील राजनयिक आणि सिनेटर या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिले आहेत.
हेही वाचा
Egypt Submarine : इजिप्तच्या लाल समुद्रात ४५ पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या पाणबुडीला जलसमाधी





