Truck Accident : नवीन कसारा घाटात ट्रक 100 फूट खोल दरीत कोसळला; एकाचा मृत्यू
Updated On:

नाशिक – मुंबई-आग्रा महामार्गावर माल वाहतूक ट्रक दरीत कोसळून भीषण अपघात झाला. अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. हा अपघात महामार्गावरील नवीन कसारा घाटात पहाटे चार वातजाच्या सुमारास घडला.
माल वाहतूक ट्रक नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी ट्रक कसारा घाटात आला असता ब्रेक फेल होऊन शंभर फूट खोल दरीत कोसळला. अपघाताची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल होऊन तीन तासांच्या अथक प्रयत्नाने गंभीर जखमी तिघांना बाहेर काढण्यात आले. तर एकाचा मृत्यू झाला आहे.
जखमींना कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आले आहे. यावेळी आपत्ती व्यवस्थापन टीम, कसारा पोलीस, महामार्ग पोलीस, रस्ते वाहतूक विभाग कर्मचारी यांनी तीन तास अथक प्रयत्न करून तीन जखमींना वाचवण्यात यश आले.





