Tropical Storm Gezani : उष्णकटिबंधिय गेझानी वादळाने मादागास्करमधील महत्वाचे बंदर तोमासिना शहराताला तडाखा (Tropical Storm Gezani) दिला असून घरे कोसळल्यामुळे किमान ९ जण ठार झाले आहेत. वादळामुळे वाऱ्याचा वेग ताशी १९५ किलोमीटर इतका असून मादागास्करच्या हवामान विभागाने काही भागांमध्ये पूर येण्याचा आणि दरडी कोसळण्याचा रेड अलर्ट दिला आहे. गेझानी वादळाचा फटका ३१ दशलक्ष लोकसंख्येला बसला आहे. दोनच आठवड्ंपुर्वी मादागास्करला अशाच मोठ्या वादळाचा फटका बसला होता.गेझानी वादळामुळे काही इमारती कोसळल्या असून ९ जण ठार झाले आहेत आणि किमान १९ जण जखमी झाले आहेत, असे राष्ट्रीय जोखीम आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने म्हटले आहे. सुमारे ३ लाख रहिवासी असलेल्या तोमासिना या मुख्य बंदराला चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला, असे रहिवाशांनी सांगितले. मादागास्करचे अध्यक्ष मायकेल रँड्रियानिरिना यांनी ऑक्टोबरमध्ये लष्करी उठावाद्वारे सत्ता हाती घेतली आहे. त्यांनी नुकसानीची पाहणी करण्यासाठी टोमासिनाला भेट दिली. वादळामुळे आलेल्या मुसळधार पावसामुळे या भागात मोठा पूर आला असून घरे आणि दुकानांची छप्पर उडून गेले असून झाडे, भिंती कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. मंगळवारपासून तोमासिनामध्ये वीज खंडित झाली आहे.गेझानी चक्रिवादळ बुधवारी मादागास्करमधून पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकले आणि आत सरकताना ते कमकुवत झाले आणि त्याचे रुपांतर उष्णकटिबंधीय वादळात झाले. याच वर्षी ३१ जानेवारी रोजी फिटिया या उष्णकटिबंधीय चक्रीवादळाने मादागास्करमध्ये १४ लोकांचा बळी घेतला आणि ८५ हजारांहून अधिक लोक विस्थापित झाले होते.