Rupali Thombre Patil : पुणे महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र निवडणुका लढणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, हालचालींना वेग आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर राजकारण सोडेन, असे विधान पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी केले होते. नुकताच त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या राजीनाम्यावर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी आपले मत मांडले आहे. “प्रशांतभाऊने फार मोठी चूक केली”, असे स्पष्ट मत रुपाली पाटील ठोंबरे यांनी प्रशांत जगताप यांच्या राजीमान्यावर मांडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकच निष्ठावंत आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे. वरिष्ठांचे आदेश मानले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या आहेत. जगताप यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना, “हा कुठला अट्टाहास आहे, त्याच शरद पवार साहेबांनी हडपसर विधानसभा मतदार संघातून तुम्हाला आमदाराकी दिली. माहापौर झाले कुणाच्या कृपेने झाले याच पवार कुटुंबाच्या कृपने झाले. त्यांची आई नगरसेविका होती. पक्षाला मोठे करणारे अध्यक्ष असतात त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो, त्यामुळे ते जे निर्णय घेतात ते कार्यकर्त्यांनी ऐकणे गरजेचे आहे,” असेही रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या आहेत. पुण्याचे माजी महपौर राहिलेल्या प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करणार यावर अनेक चर्चा सुरू होत्या. ते काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश पार पडणार आहे. तत्पूर्वी त्यांना दोन्ही शिसैनेकडून पक्षात येण्यासाठी अॅाफर देण्यात आली होती. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत फोनवरून संवाद साधला होता. पण जगताप यांनी काँग्रेस पक्षातच जाण्यावर ठाम भूमिका घेतली. हेही वाचा : Foods to Avoid For Health: नव्या वर्षात आरोग्यदायी राहायचं असेल तर आहारातून या गोष्टी टाळा, वर्षभर राहाल तरुण