Katrina Kaif : वाढलेल्या वजनावरून ट्रोल, आता कतरिनाने मौन सोडलं! रोखठोक मत केलं व्यक्त
Katrina Kaif : आता कतरिनाने या ट्रोलिंगवर भाष्य करत ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे.

Katrina Kaif : आई झाल्यानंतर काही काळ मनोरंजनविश्वापासून दूर राहिलेली अभिनेत्री कतरिना कैफ अलीकडेच पती विकी कौशलसोबत एका कार्यक्रमात दिसली. यानंतर सोशल मीडियावर तिच्या वाढलेल्या वजनावरून काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. आता कतरिनाने या ट्रोलिंगवर भाष्य करत ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे.
कतरिना लंडनमध्ये तिच्या ‘के ब्युटी’ (Kay Beauty) या ब्युटी ब्रँडच्या यूकेमधील सेलिब्रेशन कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमादरम्यान ऑनलाइन ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगच्या मुद्द्यावर बोलताना तिने सोशल मीडियावरील नकारात्मक टीकेबाबत आपले मत मांडले.
‘प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका’
कतरिना म्हणाली, “सोशल मीडियावर जे काही सुरू आहे, त्याचा आपल्या आत्मसन्मानावर आणि तत्त्वांवर परिणाम होऊ नये, याची आपण काळजी घेतली पाहिजे. आजकाल प्रत्येकाचे स्वतःचे मत असते. जर तुम्ही प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, तर स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता गमावून बसता.”
पुढे बोलताना तिने आत्मविश्वास आणि स्वतःचा स्वीकार यांचे महत्त्वही अधोरेखित केले. आयुष्यात काही प्रसंगांमध्ये आत्मविश्वास डळमळीत होऊ शकतो; मात्र प्रत्येक टप्प्यावर स्वतःचा स्वीकार करणे हीच खरी ताकद आहे. लंडनमधील कार्यक्रमातील तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक चाहत्यांनी तिच्या विचारांचे कौतुक केले.
प्रसूतीनंतरच्या बदलांवरून कतरिना ट्रोल
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी नोव्हेंबर २०२५ मध्ये मुलगा विहानचे स्वागत केले. त्यानंतर कतरिना सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये दिसू लागली. मुंबईतील गणेशोत्सवादरम्यान ती दिसल्यानंतर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या प्रसूतीनंतरच्या शरीरातील बदलांवरून आणि वजनावरून ट्रोल केले. या प्रकरणावर कतरिनाने यापूर्वी थेट प्रतिक्रिया दिली नव्हती.
सलमान खाननेही ट्रोलिंगविरोधात मांडली होती भूमिका
दरम्यान, अभिनेता सलमान खाननेही त्याच्या ‘बिग बॉस’ या शोच्या एका भागात महिलांना प्रसूतीनंतरच्या वजनावरून, वयावरून आणि दिसण्यावरून ट्रोल करण्याऱ्या प्रवृत्तीचा निषेध केला होता. महिलांच्या शरीरातील नैसर्गिक बदलांवरून त्यांच्यावर टीका करणे चुकीचे असल्याचे मत मांडत त्याने कतरिनाला पाठिंबा दिला होता.
Benefits Of Laughing: मनमोकळं हसण्याचे आरोग्याला मिळतात ‘हे’ ५ फायदे; तणावही होतो कमी!






