Trishul Warship : नौदलाची त्रिशूल युद्धनौका ग्रीसच्या सौदा उपसागरात दाखल
भारतीय नौदलाची युद्धनौका त्रिशूल (Trishul Warship) शनिवारी भूमध्य समुद्रातील आपल्या सुरू असलेल्या तैनातीदरम्यान ग्रीसमधील सौदा उपसागरात दाखल झाली.
Updated On:

Trishul Warship : भारतीय नौदलाची युद्धनौका त्रिशूल (Trishul Warship) शनिवारी भूमध्य समुद्रातील आपल्या सुरू असलेल्या तैनातीदरम्यान ग्रीसमधील सौदा उपसागरात दाखल झाली.
या बंदर भेटीदरम्यान ग्रीक नौदल आणि अथेन्स येथील भारतीय दूतावासातील (Trishul Warship) वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद, व्यावसायिक चर्चा, एकमेकांच्या जहाजांना भेटी, सांस्कृतिक देवाणघेवाण तसेच सौदा उपसागरातील नौदल सहाय्यक उपक्रम आणि नाटोच्या सागरी प्रतिबंधात्मक कारवाई प्रशिक्षण केंद्रातील सुविधांची माहिती घेणे यांचा समावेश आहे.
जहाजावरील कर्मचारी सौदा उपसागर युद्ध स्मशानभूमीत जाऊन शहीद जवानांना आदरांजलीही अर्पण करतील. बंदर भेटीदरम्यान हे जहाज पर्यटकांसाठी खुले ठेवण्यात येईल. या भेटीमुळे भारतीय नौदल आणि ग्रीक नौदल (Trishul Warship) यांच्यातील सागरी सहकार्य अधिक दृढ होण्यास आणि व्यावसायिक संबंध अधिक मजबूत होण्यास मदत होईल.






