Triptii Dimri: तृप्ती डिमरी उद्योगपतीच्या प्रेमात? ‘त्या’ फोटोमुळे चर्चांना उधाण
Triptii Dimri: तृप्ती डिमरीच्या पोस्टमधील एका खास फोटोने लक्ष वेधून घेतलं आहे. तृप्तीच्या पोस्टमध्ये तिचा कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंट देखील दिसत आहे.

Triptii Dimri: बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीने अल्पावधीतच आपल्या अभिनयाने मोठे यश संपादन केले आहे. तिचा क्युट अंदाज अनेकांचे लक्ष वेधून घेतो. ती सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते.
आपल्या दैनंदिन आयुष्यात घडत असलेल्या घडामोडी तीचाहत्यांसोबत कायम शेअर करत असते. मात्र नुकतेच तिने शेअर केलेल्या एका पोस्टमुळे तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आले आहे.
तृप्ती डिमरीनं तिच्या वाढदिवसाचे खास फोटो सोशल मीडियात शेअर केले होते. तिच्या बर्थ डे पार्टीसाठी कुटुंबासह बच्चे कंपनी देखील पाहायला मिळाली. मात्र तृप्तीच्या पोस्टमधील एका खास फोटोने लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या पोस्टमध्ये तिचा कथित बॉयफ्रेंड सॅम मर्चंट देखील दिसत आहे. Triptii Dimri
दोघांनी फोटोसाठी एकत्र पोज दिले आहे. दोघांचा हा फोटो सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. यावरून तृप्ती प्रेमात पडली का? असा सवाल नेटकऱ्यांकडून केला जात आहे.
दरम्यान, तृप्ती आणि सॅम बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. ते अनेकदा एकत्र दिसतात. मात्र दोघांनी अद्याप अधिकृतपणे त्यांच्या नात्याची घोषणा केलेली नाही. तृप्तीचा कथित बॉयफ्रेंड सॅम एक मॉडेल असून, त्याने अनेक प्रॉजेक्टसाठी काम केलं आहे. सध्या तो बिझनेसमध्ये सक्रिय असून, तो काही रेस्टॉरंटचा मालक आहे.
तृप्तीच्या कामबद्दल बोलायचे झाले तर, अल्पावधीतच तिने इंडस्ट्रीत आपली मोठी ओळख निर्माण केली आहे. ‘एनिमल’ चित्रपटानंतर तिच्या करिअरला जबरदस्त उभारी मिळाली आहे. आता ती लवकरच बिग बजेट चित्रपट ‘स्पिरिट’मध्ये दिसणार आहे. Triptii Dimri
हेही वाचा:







