Tridha Choudhury : ‘ती’ सध्या काय करतेय? इंडस्ट्रीतून अचानक गायब का झाली अभिनेत्री ‘त्रिधा चौधरी’? सध्या काय करते….

Tridha Choudhury : अभिनेता बॉबी देओलची 2020 मध्ये रिलीज झालेली वेब सीरिज ‘आश्रम’ बहुतेक लोकांनी पाहिली असेल. त्यावेळी यावरून बराच गदारोळ झाला होता. यामध्ये बाबांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे बोलले जात होते. ही वेब सिरीज यशस्वी झाली असली आणि लोकांनी भरभरून प्रेम दिले. यानंतर आणखी दोन सीझन रिलीज झाले. ‘आश्रम’ या मालिकेत बबिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिसली होती.
‘त्रिधा चौधरी’ असे त्या अभिनेत्रीचे नाव आहे. त्रिधाने वेब सीरिजमध्ये बॉबी देओलसोबत जबरदस्त रोमँटिक सीन्स दिले होते. मात्र, त्यानंतर अभिनेत्री काही काळ गायब झाल्याचं दिसून आलं. सध्या ही अभिनेत्री काय करते याबद्दल कोणालाच काही माहित नाही, चला तर मग जाणून घेऊया त्रिधा चौधरी आजकाल कुठे आहे आणि काय करतेय.
View this post on Instagram
त्रिधा चौधरीने ‘दहलीज’ या टीव्ही शोमधून तिच्या करिअरची सुरुवात केली. हा शो यशस्वी झाला. यानंतर त्रिधा चौधरीने काही बंगाली आणि साऊथ चित्रपटांमध्येही काम केले. त्रिधा चौधरी 2020 मध्ये रिलीज झालेल्या OTT मालिका ‘बंदिश डाकू’ मध्ये देखील दिसली होती. मात्र, तोपर्यंत अभिनेत्रीला विशेष ओळख मिळाली नव्हती.
यानंतर त्रिधाचे नशीब चमकले आणि तिला बॉबी देओलची ‘आश्रम’ ही वेबसीरिज मिळाली. ‘आश्रम’च्या माध्यमातून तिला प्रसिद्धी मिळाली. जिथे त्रिधाने बॉबी देओलसोबत इंटिमेट सीन देऊन खळबळ उडवून दिली होती. या मालिकेत तिने बबिता भाभीची भूमिका साकारली होती. त्रिधा चौधरी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, कारण ‘आश्रम’ या लोकप्रिय वेब सीरिजचा चौथा सीझन येणार असल्याची चर्चा आहे.
त्रिधा चौधरी आजकाल काय करत आहे?
काही काळापूर्वी नोव्हेंबरमध्ये त्रिधा चौधरीचा ‘लव्ह गॅरेज’ हा लघुपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती रोमँटिक भूमिकेत दिसली होती. हा एक लघुपट होता, ज्यामध्ये त्रिधासोबत सुशील कुमार बत्रा आणि सिमरनजीत कौर दिसले होते. या लघुपटाचे दिग्दर्शक आशिष पांडा होते.
याशिवाय त्रिधाने अलीकडेच तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये ती एका डोंगराळ भागात फिरताना दिसत आहे. त्रिधा अनेकदा तिच्या सोशल मीडिया पेजवर प्रवास करतानाचे फोटो शेअर करत असते. आणि आपले आगामी चित्रपट, प्रोजेक्ट याबद्दल माहितीत देत असते. इंस्टाग्रामवर अभिनेत्रीचा मोठा चाहता वर्ग आहे.
आश्रम 4 कधी येणार?
‘आश्रम 4’ बद्दल बोलायचे तर बातमीनुसार, ‘आश्रम 4’ MX Player वर 2025 साली रिलीज होणार आहे. ‘आश्रम 4’ बद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी निर्माते लवकरच त्याची रिलीज डेट उघड करतील अशी अपेक्षा आहे. मात्र, 2022 मध्येच ‘आश्रम 4’ चा छोटा टीझर प्रदर्शित झाला होता. तुम्ही MX Player वर ‘आश्रम’ चे उर्वरित तीन सीझन पाहू शकता.





