Satara News : दहशतवादी हल्ल्यातील हुतात्म्यांना महाबळेश्वरमध्ये वाहिली श्रद्धांजली

महाबळेश्वर : मुंबईमध्ये २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवान तसेच निष्पाप नागरिकांना मुख्याधिकारी योगेश पाटील तसेच शिवसेना महाबळेश्वर शहर व महाबळेश्वरवासियांकडून येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या भ्याड हल्ल्यास १६ वर्ष होत असून या हल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले होते.
हल्ल्यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील जवान, एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, एसीपी अशोक कामटे, एन्काऊंटर स्पेशालीस्ट विजय साळसकर, मेजर उन्नीकृष्णन यांच्यासह १४ पोलीस कर्मचारी हुतात्मा झाले. याबरोबर १६६ नागरिक मारले गेले तर ३०८ जखमी झाले होते. या वीर जवानांना महाबळेश्वर येथे श्रद्धांजली वाहण्यात आली.
या वेळी महाबळेश्वरचे मुख्याधिकारी योगेश पाटील, माजी नगरसेवक संदीप साळुंखे, शिवसेना महाबळेश्वर शहर प्रमुख विजय नायडू, राजेंद्र पंडित, ऋषिकेश वायदंडे, वर्षा आरडे, अर्चना जाधव यांनी मनोगत व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
शिरीष गांधी, प्रा. कोरडे, माजी नगराध्यक्ष संतोष आखाडे, सचिन गुजर, सुनील ढेबे, गोविंद कदम, पोलीस अधिकारी पवार, डॉ. संदीप कांबळे, ओंकार दीक्षित, गणेश भांगडीया, तुषार डोईफोडे, सुनीता फळणे,आशा जाधव,सचिन जेधे, विजय चोरगे, पंकज येवले, गौरव वाईकर, पल्लवी डोईफोडे, शीतल ओतारी, सुरेखा पंडित, प्रभा नायडू, अपूर्वा डोईफोडे,अल्ताफ मानकर, अस्लम डांगे, किशोर मोरे, रमेश चौधरी, पत्रकार रियाझ मुजावर, राहुल शेलार, राजेश सोंडकर, मिलिंद काळे व शहरातील नागरिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होते.





