रानभाज्यांवर आदिवासींचा उदरनिर्वाह

एका भाजीच्या गड्डीला मिळतोय 10 ते 15 रुपये भाव
पेठ – सातगाव पठार (ता .आंबेगाव) परिसरातील आदीवासी महिला नदीकाठच्या शेतातील अंबाडा, तांदुळसा या रानभाज्यांवर आपला उदरनिर्वाह करत असताना दिसून येत आहे. या महिला आपले कुटुंब चालवण्यासाठी दिवस दिवस शेतात फिरुन विविध प्रकारच्या रानभाज्या शोधून अर्थार्जन करत असतात. या भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्मही असतात त्यामुळे रानभाज्या आवर्जून खालल्या जातात.
ऋतुमानानुसार रानभाज्या सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची त्यांना पूर्ण माहिती असते. तेच त्यांचे पारंपरिक अन्न आहे. त्याविषयीचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरीत्या पोहचते. या वनस्पतींपैकी काहींचा वापर ते विशिष्ट सणादरम्यान, तर काही विशिष्ट दिवशीच खातात. यावरून निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ अधोरेखित होते. तादुळसा, रानपुदीना, कुर्डु, चिगळ या आयुर्वेदीक औषधी रानभाज्या आहेत. अंबाडा व तांदुळजा हया भाज्या ज्वारी पिकात विरळ प्रमाणात येतात. पेठ, पारगाव ,भावडी व कारेगाव येथील स्थानिक बाजारपेठेत विक्री करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असतात.
अत्यंत आर्थिक परिस्थितीत जीवन जगणारा आदिवासी समाज हा अत्यंत, कष्टकरी, प्रामाणिक आहेत. महिला अंबाडा व तांदुळसा या रानभाज्या आपल्या नेत्यासाठी अनेक लोकांनी आपल्या भावकी व गावात वाद-विवाद करुन नेत्यांना निवडून आणण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र वरिष्ठ पातळीवर होत असलेल्या तडजोडीमुळे सामान्य कार्यकर्ता नाराज झाला आहे.रविकून दिवसाला 50 रुपये ते 100 रुपये रोजगार मिळतो.दोनही रानभाज्या ह्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत.





