राजगुरूनगर : जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी काही दिवसापूर्वी आरक्षण जाहीर झाले तेंव्हापासून इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. जिल्हा परिषदेसाठी निवडणुकीच्या तोंडावर इच्छुक उमेदवारांनी महिला मतदारांना देवदर्शन घडविण्याचा सपाटा उठवला असून आतापर्यंत एका जिल्हा परिषद गटातील तीन चार इच्छुक उमेदवारांचा खर्च कोटींच्या घरात गेला आहे. खेड तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य म्हणजे प्रतिष्ठेचे पद झाले आहे. तालुका आर्थिक दृष्ट्या पश्चिम भाग वगळता सदन आणि सक्षम आहे. चाकण आळंदी राजगुरूनगर परिसरात जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. एमआयडीसी, सेझ, रिंग रोड आदी प्रकल्प वाढल्याने अनेकांच्या हातात पैसा खेळू लागाला आहे. निवडणुका आल्या की, मतदाराच्या मताचा भाव फुटतो, मतांची खरेदी विक्री होते. ५०० रुपयांपासून २७ हजार रुपयांपर्यंत मताला भाव दिल्याचे बाजार समितीच्या निवडणुकीत सर्वानी अनुभवले आहे. त्यामुळे निवडणूक कोणत्याही असोत काही उमेदवार मत विकत घेतोच. किंवा त्याला काही आमिषे दाखवत निवडणुका लढतो आहे. यावेळीची जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. यापूर्वी सात गट आणि १४ गण होते. त्यात आता भर पडली आहे. तालुक्यात ८ गट आणि १६ गण झाले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी गण गट आरक्षित होताच इच्छुकांचा प्रचार सुरू झाला आहे. काही गट गणात निवडणुकीपूर्वीच निवडणुकीसारखा प्रचार सुरू झाला होता. राजकीय पक्षाकडून उमेदवारांना उमेदवारी जाहीर झाल्याच्या शब्दावर इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू केली होती. वैयक्तिक गाठी भेटी सुरू झाल्या होत्या. खेड तालुक्यात जिल्हा परीषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी एकुण २ लाख ९९ हजार ७९ मतदारापैकी १ लाख ५२ हजार ९१५ पुरूष तर १ लाख ४६ हजार १५६ महिला मतदार एकूणच खेड तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. मंगळागौरी, होम मिनिस्टर, बैलगाडा शर्यती, महिलांना देवदर्शन, हळदी कुंकू, भेटवस्तू वाटप यावर इच्छुक उमेदवारांचा जोर आहेत, तर काही उमेदवार मतदारांकडे घोंगडी बैठका घेत वातावरण निर्मिंती केली आहे. गटनिहाय मतदार गट – मतदार (पुरूष – महिला) २१ ) वाडा – वाशेरे – ४३७६४ (२२८०३/२०९६१) २२ ) कडूस – चास – ४०२७० (२०२२०/२००५०) २३) वाफगाव – रेटवडी – ४३०७५ ( २१८०४/ २१२७१) २४) पिंपळगाव तर्फे खेड – मरकळ – ३८४३३ (१९५४३/१८८९०) २५) मेदनकरवाडी – काळूस – ३४७७७ ( १७६७२/ १६८०४) २६) पाईट – आंबेठाण – ४०८३७ ( २०८९०/ १९९४६ ) २७) महाळुंगे – नाणेकरवाडी – २५६६८ (१३२७२/ १२३९५) २८) कुरुळी – आळंदी ग्रामीण – ३२५५५ (१६७११/ १५८३९ ) गणनिहाय मतदार संख्या गण – मतदार (पुरूष – महिला) ४१) वाडा – २१०७६ (१०९२६/१०१५०) ४२) वाशेरे – २२६८८ (११८७७/१०८११) ४३) कडूस -२११०८ (१०५८७/१०५२१) ४४) चास – १९१६२ (९६३३/९५२९) ४५) वाफगाव – २२७७७ (११५०९/११२६८) ४६) रेटवडी – २०२९८ (१०२९५/१०००३) ४७) पिंपळगाव तर्फे खेड – २०८८४ (१०५५६/१०३२८) ४८) मरकळ – १७५४९ (८९८७/८५६२) ४९) मेदनकरवाडी- १४८५० (७६८८/७१६१) ५०) काळुस – १९६३७ (९९८४/९६४३) ५१) पाईट – २२२६२ (११४२४/१०८३८) ५२) आंबेठाण – १८५७५ ९४६६/९१०८) ५३) म्हाळुंगे – १४४५६ (७३०९/७१४७) ५४) नाणेकरवाडी – ११२१२ ( ५९६३/५२४८) ५५) कुरुळी – १६३०३ (८४२२/७८७८) ५६) आळंदी ग्रामीण – १६२५२ (८२८९/७९६१)