कराड जनता बॅंकेचे चाचणी लेखापरीक्षण
Updated On:

कराड – कराड जनता सहकारी बॅकेत कर्जे देताना मोठ्या प्रमाणात अनियमितता आणि कामकाजात अवैधपणा झाला आहे. 2002 ते मार्च 2017 या पंधरा वर्षाच्या कालाधीत हा प्रकार झाल्याचा ठपका ठेवत त्या कालवधीतील दिलेल्या कर्जांसह सर्वच व्यवहारांचे चाचणी लेखापरीक्षण करण्यात यावे, असा आदेश सहकार आयुक्त व निबंधक अनिल कवडे यांनी दिला आहे.
त्या कालवधीतील लेखा परीक्षणासाठी सहकारी संस्थेचे जिल्हा विशेष लेखा परीक्षक विजय सावंत यांची नेमणूक केली आहे. परीक्षणाचा अहवाल 30 एप्रिलपर्यंत देण्याचेही आदेश श्री. कवडे यांनी दिले आहेत.
या पंधरा वर्षाच्या कालवधीत बॅकेने दिलेले कर्ज, घेतलेल्या तारणासह परत केलेल्या ठेवींच्या व्यवहारांची सविस्तर व सखोल चौकशी होणार आहे. बॅंकिंग रेग्युलेशन कायद्यानुसार बॅंकेवर निर्बंध लादले आहेत. त्यामागची कारणेही गंभीर आहेत.





