BWF World Tour Finals 2024 : दुसऱ्या सामन्यात त्रिसा-गायत्री जोडीचं जोरदार पुनरागमन…

BWF World Tour Finals 2024, China (Hangzhou) | त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने अ गटातील दुसऱ्या सामन्यात मलेशियाच्या पर्ली टॅन आणि थिना मुरलीधरन या जोडीचा सरळ गेममध्ये पराभव केला. या विजयासह भारतीय जोडीनं BWF वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.
या हंगामातील अंतिम स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या त्रिसा आणि गायत्री या एकमेव भारतीय जोडीने आक्रमक खेळ दाखवत आपल्या प्रतिस्पर्धी जोडीचा अवघ्या 46 मिनिटांत 21-19, 21-19 असा पराभव केला.
Clutch under pressure! 💪
Treesa Jolly and Gayatri Gopichand delivered a stellar performance at the #BWFWorldTourFinals, defeating Malaysia’s Pearly Tan and Thinaah Muralitharan 2-0 (21-19, 21-19) to keep their hopes alive! 🌟 Just their second win in 8 encounters, but what a… pic.twitter.com/cR2OskSIoo
— Doordarshan Sports (@ddsportschannel) December 12, 2024
याआधी बुधवारी भारतीय जोडीला त्यांच्या पहिल्या गट सामन्यात चीनच्या लिऊ शेंग शू आणि टॅन निंग या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या जोडीकडून 20-22, 22-20, 21-14 असा पराभव पत्करावा लागला होता.
गुणतालिकेत भारतीय जोडी (T. Jolly & G. Gopichand) आता चिनी जोडीनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना शुक्रवारी नामी मात्सुयामा आणि चिहारू शिदा (N. Matsuyama & C. Shida) या जपानी जोडीविरुद्ध विजयाची नोंद करावी लागेल. हा सामना शुक्रवारी म्हणजेच 13 डिसेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 8 वाजता सुरू होईल.

