Pimpri : माथेरानमध्ये विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

माथेरान : संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जुम्मापट्टी यांच्या संयुक्त विद्यमाने माथेरान परिसरात आणि शाळेच्या आवारात विविध प्रजातींच्या ५१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमात कडूनिंब, आवळा, बेल, पारिजातक, अर्जुन, वड, पिंपळ आदी भारतीय औषधी व पर्यावरणपूरक झाडांचा समावेश होता. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने हा उपक्रम राबवण्यात आला. शालेय शिक्षक व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
संस्कार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रभाकर मेरूकर, वसंत दळवी, राजेंद्र फडतरे, संध्या स्वामी, सायली सुर्वे, अरुण कळंबे, पुष्पा संचेती, सुनीता गायकवाड, दिपाली मोरे, मंजूश्री जंगम, स्तुती सोमवंशी, सिद्धी ढेरे या सदस्यांची सक्रिय उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता म्हात्रे, शिक्षिका गीता पाटील, छाया चव्हाण, वैशाली ढोले यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावले




