टोकियो – सूर्यमालेतील चंद्र आणि मंगळ या ग्रहाबाबत शास्त्रज्ञांना मोठी उत्सुकता असते या दोन्ही ग्रहाबाबत सतत संशोधन सुरू असते आता जपानमधील शास्त्रज्ञानी चंद्र आणि मंगळावर राहण्यायोग्य वातावरण तयार करण्याबाबत संशोधन सुरू केले आहेच शिवाय चंद्र आणि मंगळापर्यंत रेल्वेच्या माध्यमातून पोहोचणे शक्य आहे का याचाही विचार सुरू केला आहे.
ही कल्पना ऐकायला विचित्र वाटत असली तर ती खरी असून जपानच्या क्योटो युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी जपानमधील काझीमा कन्स्ट्रक्शन कंपनी या आघाडीच्या कंपनीसोबत या विषयात करार केला आहे पृथ्वीवरून चंद्राच्या किंवा मंगळाच्या दिशेने प्रवास करत असताना गुरुत्वाकर्षण आणि इतर अनेक वातावरणीय आव्हानांचा सामना करावा लागतो त्यामुळे एका काचेच्या आवरणामध्ये अशा प्रकारचे वातावरण तयार करण्यात येणार आहे.
जे पृथ्वीप्रमाणे असणार आहे या वातावरणामध्ये पृथ्वीवरील लोक व्यवस्थित राहू शकतील याप्रकारच्या काचेचा आवरणाच्या साह्यानेच रेल्वेचे डबे तयार करण्याचा विचार आहे त्या माध्यमातून ग्रहांना एकमेकांशी जोडण्याचा हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी तीस वर्षे लागणार आहेत पण जपानचे शास्त्रज्ञ मात्र त्याबाबत गांभीर्याने काम करत आहेत राहशील.
चंद्र आणि मंगळ हा सारख्या ग्रहांवर मानवाला राहण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेण्याचे क्योटो युनिव्हर्सिटी आणि काझिमा कन्स्ट्रक्शन कंपनीने मनावर घेतले आहे पृथ्वीवर ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या सर्व सुविधा अंतराळात आणि चंद्रावर व मंगळावर उपलब्ध करण्याचे लक्ष या संशोधन प्रकल्पात समोर ठेवण्यात आले आहे त्यासाठी काचेची जी रचना तयार करण्यात येणार आहे त्याला चंद्रासाठी लुनाग्लास आणि मंगळसाठी मार्सग्लास असे नाव देण्यात आले आहे या ग्लासची उंची तेराशे फूट आणि व्यास साधारण तीनशे फूट असणार आहे पृथ्वीवर ज्या प्रकारचे वातावरण आहे त्याच प्रकारचे वातावरण जर आपण पृथ्वीच्या बाहेर निर्माण करू शकलो तर अशा प्रकारचा प्रवास करणे शक्य असल्याचा विश्वास जपानमधील शास्त्रज्ञांना वाटत आहे त्या दृष्टिकोनातून ही सर्व पावले टाकली जात आहेत संपूर्ण जगाचे या संशोधनाकडे लक्ष लागले आहे.