Artemis II : नासाच्या आर्टिमिस-2 (Artemis II) या अवकाश यानाने अवकाशात आतापर्यंत सर्वात लांबच्या प्रवासाचा टप्पा ओलांडला असून या अवकाश यानातील अंतराळवीरांनी यानाच्या खिडकीतून दिसणाऱ्या चंद्राचे फोटो पृथ्वीवर पाठवले आहेत. नासाने पहिल्यांदा पाठवलेल्या अपोलो १३ यानाने चंद्रावर (Artemis II) उतरण्यापुर्वी १३ एप्रिल १९७० रोजी अवकाशात २,४८,६५५ मैल (४ लाख १७१ किलोमीटर) इतका प्रवास केला होता. तो टप्पा नासाचे चार अंतराळवीर असलेल्या या यानाने सोमवारी गाठला. चंद्राच्या पलिकडे सहा तासांच्या या प्रवासादरम्यान या यानेने चंद्राच्या दुसऱ्या बाजूचे अगदी जवळून निरीक्षण केले. दोन वर्षांनंतर नासाचे अवकाश यान (Artemis II) अंतराळवीरांना घेऊन चंद्रावर उतरण्याची मोहिम राबवणार आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून चंद्राच्या दक्षिणेकडील भागाचे निरीक्षण आर्टिमिस-२ द्वारे केले जाते आहे. Artemis II लांबच्या टप्प्याला ओलांडण्यापुर्वी चंद्रावरील दोन विवरांना नाव देण्याची अनुमती आर्टिमिस-२ च्या अंतराळवीरांनी मागितली. त्यांनी या विवरांना इंटिग्रिटी आणि कॅरोल अशी नावे दिली. आर्टिमिस-२ च्या कॅप्स्यूलचे नाव इंटिग्रिटी असे असून कॅरोल हे मोहिमेचे कमांडर रीड विसेमान यांच्या दिवंगत पत्नीचे नाव आहे. त्यांचे २०२० मध्ये कर्करोगाने निधन झाले होते. एकूण १० दिवसांच्या या मोहिमेचा (Artemis II) आता परतीचा टप्पा सुरू होत असून चंद्राची प्रदक्षिणा पुर्ण केल्यानंतर आर्टिमिस-२ पृथ्वीवर परतणार आहे. चंद्राच्या पलिकडील ४० मिनिटांच्या प्रवासादरम्यान हे यान चंद्रापासून ४,०६७ मैल इतके जवळ पोचले होते. तर पृथ्वीपासून या यानाचे अंतर २ लाख ५२ हजार ७५६ मैल (४,०६,७७१ किलोमीटर) इतके होते.