उंब्रज येथे ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात : पाच ठार : सात जखमी
Updated On:

उंब्रज (प्रतिनिधी)- पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज ता.कराड गावच्या हद्दीत येथील तारळी नदीवरील पुलाचा कठडा तोडून सुमारे चाळीस फूट खोल टेम्पो ट्रॅव्हलर बस पडून झालेल्या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातातील मृतांमध्ये तीन पुरुष, एक महिला व तीन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. हा अपघात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला. घटनास्थळी स्थानिक नागरिक व उंब्रज पोलिस यांचे तातडीने मदत कार्य सुरू होते.
जखमींना उपचारासाठी सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त ट्रॅव्हलर बस (MH01CR9565)ही वाशी वरून गोवा येथे निघाली होती.





