Trash: दिवाळीत वाढला तब्बल ३०० टन कचरा
Trash:

दसरा-दिवाळीत रोज ३०० टन अतिरिक्त कचरा; संकलनाचा आकडा ३१०० टनांवर
Trash: दिवाळीसुट्टीनिमित्त अनेकजण परगावी गेले असले तरी शहरातील कचरानिर्मितीचे प्रमाण काही कमी झाले नाही, उलट कचरा ३०० टनाने वाढल्याचे दिसून आले आहे. एरवी २७०० ते २८०० टन कचरा संकलन होते.
मात्र, दसरा, दिवाळी सणाच्या कालावधीत तब्बल तीन हजार ते ३१०० टन कचरा संकलित होऊ लागला आहे. त्यामुळे एरवीच्या तुलनेत सणासुदीच्या कालावधीत ३०० टन कचरा वाढल्याची सद्यःस्थिती आहे. यामध्ये उडवलेल्या फटाक्यांच्या कागदाचा आणि तत्सम सामुग्री असलेल्या कचऱ्याचा समावेश आहे.
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे नोकरदार, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने गावी परत जातात. त्यामुळे शहरातील रस्ते, बाजारपेठांमधील गर्दी कमी झाल्याचे चित्र दिसते. याउलट, शहरात असलेल्या नागरिकांकडून दिवाळी सणाच्या निमित्ताने घरातील स्वच्छता, साफसफाई करण्यास प्राधान्य देण्यात आले.
याबरोबरच नवीन खरेदी, सजावटीमुळेसुद्धा टाकाऊ वस्तूंचे प्रमाण वाढल्याने कचऱ्याचे प्रमाणही वाढत असल्याचे चित्र आहे. सर्वसाधारण दिवसांच्या तुलनेत दररोज २०० ते ३०० टन अतिरिक्त कचऱ्याची भर पडत आहे. दसरा ते दिवाळी या कालावधीत शहरात दररोज तब्बल ३००० ते ३१०० टन कचरा संकलित होत आहे. घरोघरी दिवाळी जोरदार साजरी होत असल्याने कचरा संकलनात मोठी वाढ होत आहे.
दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत घरोघरी स्वच्छता मोहीम राबवली जात असल्याने अडगळीत पडलेल्या वस्तू, जुने फर्निचर, नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि निरुपयोगी साहित्य नागरिकांनी बाहेर काढले आहे.
दसरा, दिवाळीच्या कालावधीत कचऱ्याचे प्रमाण वाढते. सर्वसाधारण दिवसांत शहरात दररोज २७०० ते २८०० टन कचरा संकलित होतो. दसरा ते दिवाळी या काळात हे प्रमाण ३००० ते ३१०० टनांपर्यंत पोहोचते. तरीही सफाई कर्मचाऱ्यांकडून शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य दिले जात आहे.
– संतोष वारुळे, प्रमुख, घनकचरा व्यवस्थापन विभाग, महापालिका.





