Crime News : नागरगाव परिसरातून ट्रान्सफॉर्मर चोरी; ९६ हजाराचा मुद्देमाल माल लंपास
Updated On:

शिरूर : शिरूर तालुक्यातील नागरगाव गावच्या हद्दीत पारगाव पुलाजवळील फॉरेस्ट परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर अज्ञात चोरट्यांनी चोरीस नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
फिर्यादी रामेश्वर दिगंबर चव्हाण ( वय ४९ वर्षे ), रा. पुसद, सध्या रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे यांच्या तक्रारीवरून शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन ही घटना २ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते ३ ऑगस्ट सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असुन ट्रान्सफॉर्मर मधील ४२० लिटर ऑईल सांडवून नुकसान करण्यात आले असुन सुमारे १६० किलो तांब्याच्या तारा असा ९६ हजार रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिंदे हे करत आहेत.





