Gram Panchayat Result: पश्चिम हवेलीतील दोन ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन
Updated On:

पुणे – हवेली तालुक्यातील मालखेड व खानापूर या दोन ग्रामपंचायतींच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलला पराभवाचा झटका बसला आहे. मालखेड मधील श्री.काळभैरवनाथ परिवर्तन पॅनलचे सर्व सात उमेदवार निवडून आले.
त्याचप्रमाणे खानापूर मधील श्रीनाथ मस्कोबा व श्री काळभैरवनाथ ग्राम विकास पॅनल व श्री काळभैरवनाथ व श्रीनाथ मस्कोबा परिवर्तन पॅनल यांच्यात चुरशीची लढत झाली. श्री काळभैरवनाथ व श्रीनाथ मस्कोबा परिवर्तन पॅनल ने ११ पैकी ६ जागा मिळवून विजय मिळवला. या सर्व उमेदवारांनी आज विजयानंतर गावातील ग्रामदैवताचे दर्शन घेत मतदारांचे घरोघरी जाऊन आभार मानले.





