IAS Transfer : राज्यातील ७ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली? वाचा संपूर्ण यादी…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये प्रशासकीय उलथापालथला वेग आला आहे. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. फडणवीस सत्तेवर आल्यापासून बैठकीचा दिवस आणि बदलीचा दिवस ही नवी ‘परंपरा’ राज्यात रुजली आहे.
या आठवड्यातही सात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा निर्णय मुख्यमंंत्री फडणवीस यांनी घेतला. या बदल्यांमुळे पाणीपुरवठा, स्वच्छता, पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, सार्वजनिक आरोग्य आणि ग्रामीण विकास अशा महत्त्वाच्या विभागांमध्ये नवे चेहरे दिसणार आहेत. सामान्य प्रशासन विभागाने तात्काळ आदेश जारी केले आहेत.
कोणाची कुठे बदली?
संजय खंदारे (IAS:1996)
जुने पद: प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय
नवे पद: प्रधान सचिव (पर्यटन), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय
परराग जैन नैनुतिया (IAS:1996)
जुने पद: प्रधान सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग
नवे पद: प्रधान सचिव, पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, मंत्रालय
कुणाल कुमार (IAS:1999)
नवे पद: व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प, मुंबई
वीरेंद्र सिंह (IAS:2006)
जुने पद: सचिव (२), सार्वजनिक आरोग्य विभाग
नवे पद: सचिव (माहिती तंत्रज्ञान), सामान्य प्रशासन विभाग
ई. रावेंदीरन (IAS:2008)
जुने पद: मिशन डायरेक्टर, जल जीवन मिशन, नवी मुंबई
नवे पद: सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय
एम.जे. प्रदीप चंद्रन (IAS:2012)
जुने पद: अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे
नवे पद: प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे SMART प्रकल्प, पुणे
पवनीत कौर (IAS:2014)
जुने पद: उपमहासंचालक, यशदा, पुणे
नवे पद: अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, पुणे




