राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई – राज्यातील 7 सनदी अधिकाऱ्यांच्या गुरुवारी बदल्या करण्यात आल्या. त्यात सोलापूरच्या जिल्हा परिषद मुख्याधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुण्यात बदली करण्यात आली असून, त्यांच्यावर पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सरकारच्या आदेशानुसार, विनायक महामुनी यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर या पदावर करण्यात आली आहे. तर सतीशकुमार खडके यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बीड या पदावर करण्यात आली आहे. नागपूर झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांची नागपूर स्मार्ट सिटी सीईओ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
मनीषा आव्हाळे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी, पुणे या पदावर करण्यात आली आहे. तसेच कुलदीप जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर या पदावर करण्यात आली आहे. प्रदीप कुमार डांगे यांची नियुक्ती आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई या पदावर करण्यात आली आहे.





