Tukaram Mundhe : नुकतेच दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरुन बदली करण्यात आलेले सनदी अधिकारी तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी दिव्यांग बांधवांनी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सूरू केले. विशेष म्हणजे तुकाराम मुंढेंच्या (Tukaram Mundhe) बदलीनंतर मुंबईतील मंत्रालय परिसरात देखील दिव्यांग बांधवांनी असेच आंदोलन करत बदली रद्द करण्याची मागणी केली होती. सध्या राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. मंगळवारी आणखी 11 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. Tukaram Mundhe | याआधी गेल्याच आठवड्यात 25 आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या करण्यात आली होत्या.यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. तर तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली आहे. मात्र, दिव्यांग विभागाचे सचिव असताना दिव्यांगांसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे दिव्यांग बांधवांनी त्यांच्याप्रती आदर व्यक्त करत त्यांची बदली रद्द करण्याची मागणी केली. तसेच,नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आज विधिमंडळ अंदाज समितीची बैठक पार पडली. या बैठकीत दिव्यांग बांधव मुंडे (Tukaram Mundhe) यांच्या बदलीवरून आक्रमक झाल्याचे दिसून आले.