Train Accident Death | रेल्वेच्या धडकेत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
लोणी काळभोर – पुणे- दौंड लोहमार्गावरून चाललेल्या रेल्वे गाडीने दिलेल्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीतील पेटकर वस्ती परिसरात घडली. हा अपघात शुक्रवारी (दि.२९) मध्यरात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास झाला आहे. नीरज रामबली वर्मा (वय.२०, मूळ रा. पिवरवार, रिवा, मध्यप्रदेश) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
नीरज वर्मा हा कामानिमित्त पुण्यात आला होता. कुंजीरवाडी परिसरातील नर्सरीत काम करीत होता. वर्मा हा रेल्वे लाईन क्रॉस करताना एका रेल्वे गाडीने जोरदार धडक दिली. यात वर्मा यांचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे बीट मार्शल वैभव खोत, प्रसाद ताम्हाणे, पोलीस अंमलदार प्रशांत सुतार व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वर्मा यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.


