बीड : बीड जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका सात महिन्यांच्या चिमुकलीच्या घशात चॉकलेट अडकले अन् तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. मृत चिमुकलीचं नाव आरोही आरोही आनंद खोड असे आहे. नेमकं काय घडलं? याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील काटवटवाडी येथील तीन वर्षीय चिमुकली आरोही घरात खेळत असताना जमिनीवर पडलेले चॉकलेट तिने तोंडात टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या वयामुळे ती नीट चावून खाऊ शकली नाही. अचानक चॉकलेट घशात अडकल्याने तिला श्वास घेणेही कठीण झाले. काही क्षणातच तिची प्रकृती गंभीर बनली. कुटुंबीयांनी तातडीने तिला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिचा दुर्दैवी अंत झाला. या अकाली निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. आरोही आनंद खोड असे मृत मुलीचे नाव असून ती अवघ्या सात महिन्यांची होती. कोवळ्या जीवासाठी चॉकलेट काळ बनून आलं अन् चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.