पुणे – रविवारी संध्याकाळी साताऱ्याहून पुण्याकडे येताना कापूरहोळच्या पुढे शिवरे गावा नजीक भर पावसाळ्यात महामार्गाचे काम सुरू असून त्यामुळे महामार्गावरील सर्व वाहतूक सेवा रस्त्यावरून सुरू आहे. आज संध्याकाळी शिवरे गावानजीक सेवा रस्त्यावरच एक कंटेनर बंद पडल्याने वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. संपूर्ण महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावरून एकाच लेनमधून सुरू राहिल्याने महामार्गावर सुमारे चार किलोमीटर पर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. साताऱ्याहून शिवरे गावापर्यंत पावणे दोन तासात येणाऱ्या वाहनांना पुढील चार किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी तब्बल एक तासांचा वेळ लागत होता. या सर्व प्रकारामुळे वाहनचालकांची प्रचंड गैरसोय झाली. पोलीस व महामार्ग प्रशासनाला याबाबतचे कुठलेही सोयरसुतक नव्हते. त्यामुळे तर कोंडीमध्ये रात्री उशिरापर्यंत भर पडत गेली.