Swarget : चौकाला वाहतूक कोंडीचे ग्रहण, पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडणे दिव्य कसरत

पुणेः शहरातील मध्यवर्ती ठिकाण म्हणून स्वारगेटची ओळख आहे. स्वारगेटमधील मुख्य चौकातून प्रवास करणाऱ्या वाहनांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. यामुळे मुख्य चौकात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. ही वाहतूक कोंडी निर्माण होण्यामागची अनेक कारणं आहेत. मूळात स्वारगेट चौकतच स्वारगटे बसस्थानक आहे. त्याच्यासमोरील बाजूस पीएमपीएमएल बसस्थानक आणि आता त्याच्या पाठीमागील बाजूस नव्याने उभारणी करण्यात आलेले मेट्रोचे स्टेशन आहे. यामुळे प्रवाशांच्या संख्या मोठी असून सोबतच इतर वाहनांची वर्दळ असल्याने स्वारगेटमधील वाहतूक कोंडी ही नित्याचीच बनली आहे.
स्वारगेट बसस्थानच्या प्रवेशद्वार आणि समोर असलेले पीएमपीएमल बस थांबच्या शेजारीच बेशिस्तपणे रिक्षा लावलेल्या दिसतात. येथे मेट्रोची देखील कामे सुरू आहेत. या चौकातील सिंगल मोडून वाहनचालक रस्ता पार करीत आहेत. या सगळ्यात मात्र रस्ता ओलांडण्यासाठी पादचाऱ्यांना दिव्य कसरत करावी लागत आहेत. जीव मुठीत घेऊन त्यांना रस्ता ओलांडावा लागत असून काही वेळा वाहने अक्षरःशहा अंगावर येण्याचे प्रमाण देखील घडत आहे. यामुळे आता स्वारगेट चौकाला लागलेले वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटणार तरी कधी? असा प्रश्ना निर्माण झाला आहे.
…म्हणून होते वाहतूक कोंडी
स्वारगेट बसस्थानकात दररोज मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस येत असतात. या ठिकाणीची जागा आता कमी पडू लागली आहे. त्यामुळे एसटी चालक स्थानकात जिथे जागा मिळेल तिथे बस उभी करीत आहेत. यामुळे मागून आलेल्या एसटी बस तशाच्याच रस्त्यात उभ्या राहत असल्याने परिणामी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या सर्वांचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर वाहतूक कोंडीत अधिकची भर पडत आहे.
वाहतूक कोंडीची ही आहेत प्रमुख कारणं
- स्वारगेट बसस्थानकाला जागा अपुरी पडत आहेत.
- या रस्त्यावर मेट्रोची कामे सुरू आहेत.
- बेशिस्त पद्धतीने लावण्यात आलेल्या रिक्षा
- पोलीस प्रशासनाचे वाहतूक कोंडी सोडवण्याचे नियोजन अपयशी




