Satara News : न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्याशी पर्यटनमंत्री शंभूराज देसाईंनी साधला संवाद
Updated On:

कोयनानगर : न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनी आज राजभवन, मुंबई येथे महाराष्ट्राचे राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. या महत्वपूर्ण बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील पर्यटन विकास, ऐतिहासिक गडकिल्ले, निसर्गरम्य स्थळे आणि धार्मिक तीर्थस्थळे यांसंबंधी माहिती पंतप्रधान लक्सन यांना देण्यात आली. न्यूझीलंडच्या पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट द्यावी, यासाठी दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा झाली.
सातारा येथे एप्रिलमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवासाठी न्यूझीलंडच्या अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले. या भेटीमुळे महाराष्ट्र आणि न्यूझीलंड यांच्यातील पर्यटन व सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.





