Loksabha : अधिररंजन चौधरींचे लोकसभेत नोटाबंदीवर टीकास्त्र, म्हणाले “नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे…”

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी लोकसभेत नोटाबंदीवर टीकास्त्र सोडले. चलनात असणारी रोकड आणि बनावट चलन यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे नोटाबंदी उद्दिष्टे गाठण्यात सपशेल अपयशी ठरली, असे त्यांनी म्हटले.
अधिर यांनी लोकसभेत शून्य प्रहरावेळी नोटाबंदीचा मुद्दा उपस्थित केला. तो निर्णय घेण्यात आला त्यावेळी म्हणजे 2016 या वर्षी 18 लाख कोटी रूपयांची रोकड चलनात होती. आता चलनात असणारी रोकड 31 लाख कोटी रूपयांवर पोहचली आहे. बनावट चलन आणि स्विस बॅंकांमधील ठेवीही वाढल्या आहेत.
Today in Loksabha pic.twitter.com/lOKGUKcZDb
— Adhir Chowdhury (@adhirrcinc) December 9, 2022
नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्थेचे आरोग्य बिघडले आहे. बनावट चलन, दहशतवाद, काळा पैसा रोखण्यासाठी तो निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले गेले. पण, कुठलेच उद्दिष्ट साध्य झाले नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
समृद्ध समाजाच्या निर्मितीत संतपीठाची भूमिका महत्त्वाची – मंत्री चंद्रकांत पाटील
अधिर यांना भाजपच्या निशिकांत दुबे यांनी प्रत्युत्तर दिले. देशात कॉंग्रेसची राजवट असताना भ्रष्टाचार, टेरर फायनान्सिंग यांचे प्रमाण वाढले होते. त्यांचे उच्चाटन करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) नोटाबंदीची अंमलबजावणी करण्याचे ठरवले, असे ते म्हणाले.




