Bangladesh Weather News : बांगलादेशात तुफान पाऊस.! भूस्खलन आणि पुरात ४४ जणांचा बळी
बांगलादेशात अतिवृष्टीमुळे झालेले भूस्खलन आणि पुराशी संबंधित घटनांमध्ये आठवड्याभरात किमान ४४ जणांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Bangladesh Weather News – बांगलादेशात अतिवृष्टीमुळे झालेले भूस्खलन आणि पुराशी संबंधित घटनांमध्ये आठवड्याभरात किमान ४४ जणांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पूरामुळे बांगलादेशातील नद्या धोक्याच्या पातळीवरून वहात आहेत. या पुरामुळे तब्बल २.५ लाख लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.
बांगलादेशात गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून आज पहाटे ६ वाजेपर्यंत ७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे राजधानी ढाक्यातील सार्वजनिक व्यवहार ठप्प झाले आहेत.
पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी सरकारने लष्कर आणि नौदलाला तैनात केले आहे. पुराचे पाणी घरात घुसल्यामुळे अनेकांनी घरांच्या छतांवर आश्रय घेतला असून त्यांना सरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी हवाई दलाचीही मदत घेतली जाते आहे.
दिनांक ५ जुलै पासून शनिवारपर्यंत पुराशी संबंधित घटनांमध्ये ४४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पुराचा फटका अंदाजे २ लाख ६७ हजार लोकांना बसला असल्याचा अंदाज असल्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले.
मरण पावणाऱ्यांपैकी बहुतेकांचे मृत्यू दरडी कोसळण्याने झाले. तर अनेक जण पुरामध्ये बुडून किंवा वाहून गेल्याने मरण पावले आहेत, असे या प्रवक्त्याने सांगितले.
पूरग्रस्त भागातील ४४ हजार ४५७ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले गेले आहे. तर ईशान्य आणि अग्नेयेकडील १,१०० ठिकाणी तात्पुरत्या छावण्या उभारल्या गेल्या आहेत.
बांगलादेशात चार प्रमुख नद्यांच्या खोऱ्यांमध्ये सुमारे दिड हजार नद्या आहेत. मुसळधार पावसामुळे ईशान्येकडील मेघना खोरे आणि हिल खोऱ्यातल्या नद्यांना महापूर आला आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातील पूरस्थिती आगामी काळात अधिक गंभीर बनली आहे. ण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.





