Yashasvi Jaiswal Notice : मोठी बातमी! यशस्वी जैस्वाल अन् शफाली वर्मा अडचणीत; ‘नाडा’ने पाठवली नोटीस, २ वर्षांच्या बंदीची टांगती तलवार?
Yashasvi Jaiswal Notice : या कारवाईमुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, खेळाडूंच्या शिस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Yashasvi Jaiswal and Shafali Verma receive notices from NADA : भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जाणारे दोन युवा तारे यशस्वी जैस्वाल आणि शफाली वर्मा सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी (NADA) कडून या दोन्ही खेळाडूंना ‘वेअरअबाउट्स फेल्योर’ (Whereabouts Failure) नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. या कारवाईमुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, खेळाडूंच्या शिस्तीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
नेमकं प्रकरण काय? (Yashasvi Jaiswal Notice)
अँटी डोपिंग नियमांनुसार, आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्यांच्या वास्तव्याची आणि प्रशिक्षणाची अचूक माहिती (वेअरअबाउट्स) नियमितपणे ‘नाडा’ला देणे बंधनकारक असते. याद्वारे उत्तेजक द्रव्य चाचणीसाठी अधिकारी कोणत्याही क्षणी खेळाडूची भेट घेऊ शकतात. यशस्वी जैस्वालची चाचणी १७ डिसेंबर रोजी आणि शफाली वर्माची चाचणी ७ नोव्हेंबर रोजी करण्याचे नियोजित होते. मात्र, डोपिंग नियंत्रण अधिकारी (DCO) जेव्हा निश्चित ठिकाणी पोहोचले, तेव्हा हे दोन्ही खेळाडू तिथे उपस्थित नव्हते.
स्पष्टीकरण न दिल्याने नोंदवली गेली चूक – (Yashasvi Jaiswal Notice)
YASHASVI JAISWAL AND SHAFALI VERMA SEEM TO BE IN TROUBLE😱
🚨Yashasvi Jaiswal and Shafali Verma have been issued notices by the National Anti-Doping Agency (NADA) for a whereabouts failure (missing scheduled out-of-competition doping tests).
Both players have been given 7 days… pic.twitter.com/M4ds8lhN8c
— Shanu (@Shanu_3010) May 9, 2026
या घटनेनंतर नाडाने दोन्ही खेळाडूंना कारणे दाखवा नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागवले होते. यशस्वीला १८ फेब्रुवारीपर्यंत आणि शफालीला २० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, दोन्ही खेळाडूंकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने, त्यांच्या नावावर ‘चाचणी चुकवल्याची’ (Missed Test) अधिकृत नोंद करण्यात आली आहे.
कारवाईची टांगती तलवार? (Yashasvi Jaiswal Notice)
Yashasvi Jaiswal Notice : मोठी बातमी! यशस्वी जैस्वाल अन् शफाली वर्मा अडचणीत; ‘नाडा’ने पाठवली नोटीस, २ वर्षांच्या बंदीची टांगती तलवार?
नियमांनुसार, जर एखादा खेळाडू १२ महिन्यांच्या कालावधीत तीन वेळा ‘वेअरअबाउट्स’ नियमांचे उल्लंघन करताना आढळला, तर त्याच्यावर दोन वर्षांपर्यंतची बंदी घातली जाऊ शकते. सध्या यशस्वी आणि शफालीसाठी ही पहिलीच वेळ असल्याने त्यांच्यावर थेट बंदी येणार नाही, परंतु त्यांना त्यांची निर्दोषता सिद्ध करावी लागेल. दोन्ही खेळाडूंकडून अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र आगामी सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





